महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चेंबूर येथे बलात्कार झालेल्या जालन्याच्या 'त्या' पीडितेचा मृत्यू

जालना जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीवर ४ अज्ञातांनी चेंबूर विभागातील चुनाभट्टी येथे सामूहिक बलात्कार केला होता. या तरुणीचा आज औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Aug 29, 2019, 9:12 AM IST

Updated : Aug 29, 2019, 11:00 AM IST

मुंबई -चेंबूर विभागातील चुनाभट्टी येथे जालना जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीवर ७ जुलै २०१९ रोजी ४ अज्ञातांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर पीडितेला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

जालना जिल्ह्यातील १९ वर्षीय तरुणी चेंबूर येथे आपल्या भावाकडे राहण्यासाठी आली होती. ती चेंबूर परिसरात ७ जुलैला मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असे घरी सांगून बाहेर पडली. नंतर तिच्यावर अज्ञात ४ जणांनी सामूहिक अत्याचार केले. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ती घरी परतली आणि झोपली.

तेव्हापासून ती आजारी पडली होती. तिचे दोन्ही पाय लटलट कापतात, तिला पॅरॉलिसिस झाला असावा, असे सांगून भावाने गावाकडील वडिलांना फोन करुन बोलावून घेतले. नंतर गावी उपचार करू असे म्हणून १७ जुलैला ते तिला मुंबईहून गावी घणसांगवी येथे घेऊन गेले.

जालना जिल्ह्यातील बलात्कार पीडितेचा औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला

गावात प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांनी तिला २५ जुलैला औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (घाटी) दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावरील उपचाराची कागदपत्रे तपासली आणि तिची तपासणी केली तेव्हा तिचा रक्तस्त्राव थांबत नव्हता तिच्यासोबत काहीतरी गंभीर घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी तिच्या आई-वडिलांना सांगितले. यानंतर तिच्या आई-वडिलांनी तरुणीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने तिच्यावर ४ जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. मात्र, कोणी अत्याचार केले हे तिला सांगता आले नाही. शिवाय तिची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांनीही तिच्याकडे अधिक विचारपूस केली नाही.

पीडितेने घाबरल्यामुळे ७ जुलैला मुंबईतील चेंबूर येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेची कोठेही वाच्यता केली नव्हती. आजारी पडल्याने तिला नातेवाईकांनी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल केले, तेव्हा तेथील डॉक्टरांना हा प्रकार समजला. यानंतर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन तिच्या वडिलांनी याविषयी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

गुन्हा मुंबईत घडला असल्याने बेगमपुरा पोलिसांनी तो गुन्हा झिरो करुन मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात वर्ग केला. घटनेचा पुढील तपास चुनाभट्टी पोलीस करत आहेत. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात डाक्टरांनी उपचार सुरू केले तेव्हा ती इतर आजारांनी ग्रासल्याचे निष्पन्न झाले. २५ जुलैपासून तिचे शरीर उपचारास साथ देत नव्हते. ४ नराधमांनी केलेल्या सामूहिक अत्याचारमुळे पीडित तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला या धक्क्यातून तिला सावरता आले नाही. अत्याचारामुळे झालेल्या अतिरक्तस्त्रावाने तिची प्रकृती चिंताजनक बनत गेली. बुधवारी रात्री मृत्यूसोबत सुरू असलेली तिची झुंज अखेर अयशस्वी ठरली.

Last Updated : Aug 29, 2019, 11:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details