महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोविड टेस्टसाठी सॅम्पल जमा करणाऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये मेलेला डास, तपासणीवर प्रश्नचिन्ह - कोरोना टेस्ट रिपोर्ट

कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी सॅम्पल जमा करण्यासाठी देण्यात आलेल्या टेस्ट ट्युबमध्ये चक्क मेलेला डास आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत घडला आहे. सिडको एन-२ भागात हा प्रकार समोर आला आहे. यामुळे आरटीपीसीआर चाचण्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Dead mosquito in test tube collecting samples
Dead mosquito in test tube collecting samples

By

Published : Jun 19, 2021, 3:33 PM IST

Updated : Jun 19, 2021, 5:35 PM IST

औरंगाबाद - कोविड निदानासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी गेलेल्या नागरिकाला दिलेल्या सॅम्पल टाकण्यासाठीच्या टेस्ट ट्युबमध्ये डास आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारामुळे चाचणीचे वेगळे परिणाम अथवा दोष येण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कोविड टेस्टसाठी सॅम्पल जमा करणाऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये मेलेला डास
सिडको एन-2 भागातील महापालिका कम्युनिटी हॉल केंद्रामध्ये हा प्रकार समोर आला. सिडको एन-तीन येथील अभ्यासिका चालवणारे अक्षय गोयल हे कम्युनिटी हॉल येथील केंद्रावर कोविड चाचणीसाठी गेले होते. तेथे त्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करायची असल्याने त्यांना नमुना घेण्यासाठी टेस्ट ट्यूब आरोग्य सेवकाने दिली व थांबण्यास सांगितले. या बाटलीतील पिवळ्या द्रवात त्यांना डास दिसून आला. हे पाहून गोयल यांनी हा प्रकार चाचणी केंद्रावरील आरोग्य सेवकाला सांगितला.

सेवकाने ही ट्युब चुकीने आल्याचे सांगत तातडीने त्यांना दुसरी बाटली दिली. यावर गोयल यांनी सांगितले की, चाचणीसाठीच्या द्रवात नाकातील व लाळेतील द्रव जतन करण्यासाठी ठेवण्यात येतात. परंतु डास आढळणे हे धोक्याचे आहे. तीच बाटली नागरिकांना दिली जात असेल तर संभाव्य चाचणीत दोष आढळू शकतात. माझ्यासोबत हा प्रकार घडला. मी वेळीच लक्ष दिले म्हणून ठीक आहे. परंतु इतरांसोबत असे प्रकार घडू नयेत, अशी भावना अक्षय गोयल यांनी व्यक्त केली.

Last Updated : Jun 19, 2021, 5:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details