औरंगाबाद - जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्यातील अंतर्गत वाद काही नवे नाहीत. मात्र, त्यातच आता खैरे यांनी दानवे आणि माझी लेवल एक नाही, मी राज्यातील 13 नेत्यांपैकी एक असल्याचे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे.
खैरे - दानवे वाद जुनेच
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांच्यात वाद हे नेहमीच पाहायला मिळाले. अनेक वेळा अंतर्गत वादाची चर्चादेखील रंगली आहे. (Chandrakant Khaire Vs Ambadas Danve ) त्यातच दोघांमध्ये मोठा दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहेत का? याबाबत खैरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर माझी आणि दानवे यांची एक लेवल नाही. मी पक्षातील तेरा नेत्यांपैकी एक आहे. (Shiv Sena leader Chandrakant Khaire) पक्ष घटनेनुसार ते पद आहे. नेते, संपर्क, संपर्क नेते आणि नंतर जिल्हाप्रमुख असा क्रम लागतो. त्यामुळे दानवे आणि माझी बरोबरी करण्याचा प्रश्नच येत नाही. मी कोणालाही अडवण्याचा प्रयत्न केला नाही. मी जर तसे केला असते, तर आज काड्या करणारी लोक मोठी झाली नसती. असा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अप्रत्यक्षरीत्या अंबादास दानवे यांना लावला आहे.