महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तिरुपती बालाजी संस्थानचे बनावट पास तयार करणाऱ्याला सायबर पोलिसांनी केले जेरबंद - etv bharat marathi

तिरुपती बालाजी संस्थानचे बनावट पास काढून तब्बल ६१ भाविकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्यास ग्रामीण सायबर पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या. आशिष नारायण गुनाले असे त्या आरोपीचे नाव आहे.

तिरुपती बालाजी संस्थानचे बनावट पास तयार करणाऱ्याला सायबर पोलिसांनी केले जेरबंद
तिरुपती बालाजी संस्थानचे बनावट पास तयार करणाऱ्याला सायबर पोलिसांनी केले जेरबंद

By

Published : Oct 12, 2021, 6:09 PM IST

औरंगाबाद : तिरुपती बालाजी संस्थानचे बनावट पास काढून तब्बल ६१ भाविकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्यास ग्रामीण सायबर पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या. आशिष नारायण गुनाले (२२, रा. गजानननगर, गारखेडा) असे त्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे तो ऑनलाईन जॉब वर्क करत असून आतापर्यंत असे मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे काढली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

या प्रकरणी बीडकीन येथील फिर्यादीला कुटूंबासह तिरुपतीला जायचे होते. दरम्यान आशिषचा ऑनलाईन जॉबवर्क असल्याने फिर्यादींनी त्याच्याशी संपर्क केला होता. आशिषने फिर्यादीकडून देवस्थानला जाणाऱ्या भाविकांची नावे, आधारकार्ड सर्व माहिती व्हाटस अॅपद्वारे मागवून घेतली. तसेच प्रत्येकी ३०० रुपये किंमतीचे दर्शनपास काढून देतो असे म्हणत १५ हजार रुपये स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करुन घेतले.

दरम्यान काही दिवसानंतर आरोपी आशिष याने फिर्यादी भाविकांना तसेच ‘तुमचे तिरूपती बालाजीचे देवस्थानचे पासेस आले आहेत’ असे सांगत १७ सप्टेंबर रोजी तुमचे दर्शन असल्याचे सांगून पीडीएफ स्वरूपातील पासेस फिर्यादीच्या व्हॉटसअॅपवर पाठवले. सदर दर्शन पासेस घेऊन फिर्यादी बिडकीन येथील गणेश चौधरी व सोबत ६० जण तिरूपती बालाजी येथे पोहोचले व दर्शन रांगेत तिरूपती देवस्थानच्या सुरक्षा अधिकारी यांनी सदर पासेसची तपासणी केली असता त्यांनी सदरच्या पासेस बनावट असल्याचे समोर आले. तसेच त्यांना दर्शन न करता वापस यावे लागले होते. प्रकरणात फिर्यादीने ५ ऑक्टोंबर रोजी ग्रामीण सायबर पोलिसांत धाव घेतली असता, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपीच्या ताब्यातून संगणक, कलर प्रिंटर, स्कॅनर, मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सायबरचे निरीक्षक रविंद्र निकाळजे, उपनिरीक्षक प्रविण पाटील, कैलास कामठे, संदिप वरपे, दत्ता तरटे, रविंद्र लोखंडे, नितिन जाधव, योगेश मोईम, सविता जायभाये, लखन पचोळे, योगेश दारवंटे, गजानन बनसोड, मुकेश वाघ, रूपाली ढोले यांच्या पथकाने केली.

हेही वाचा -पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून एकाची हत्या, आरोपीचा शोध सुरू

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details