औरंगाबाद -स्मार्ट सिटी ( Smart City Aurangabad ) अंतर्गत शहरात विविध काम केले जात आहेत. या कामांमध्ये तयार करण्यात आलेले सायकल ट्रॅक वादाच्या भोवऱ्यात अडकले ( Cycle track in controversy ) आहेत. शहरात सायकल चालवणाऱ्या नागरिकांची संख्या नगण्य आहे. त्यात कोणाची मागणी नसताना चार ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. ज्यावर सायकल कमी आणि अतिक्रमण जास्त होत असल्याचं पाहायल मिळत ( Encroachment on cycle track ) आहेत.
सायकलस्वार नसताना चार ट्रॅक -औद्योगिक विकास झपाट्याने करणार शहर म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक शहरात आधुनिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात सायकल चालवणाऱ्या नागरिकांना मोकळीक आणि सुरक्षा मिळावी याकरिता महानगर पालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत सायकल ट्रॅक तयार केले. शहरात आता पर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून पाच ठिकाणी ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. ज्यामधे क्रांतीचौक - रेल्वेस्टेशन रस्ता, न्यायालय परिसर, टिव्ही सेंटर रस्ता, एम जी एम रस्ता यासह आणि आणखी एक रस्त्यावर हे ट्रॅक उभारण्यात आले आहेत. उद्देश चांगला असला तरी या ट्रॅक वर सायकल चालवणाऱ्या नागरिकांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. त्यात सायकल ट्रॅक मुळे रस्त्याची रुंदी कमी झाली, वाहन उभी करायला जागा नसल्याने वाहन काही ठिकाणी रस्त्यावर उभी करावी लागतात, परिणामी वाहतुकीला अडचण होत आहे. त्यामुळे इतका खर्च कशाला आणि त्यातून काय साध्य झाले असा प्रश्न उपस्थितीत केला जातोय.