औरंगाबाद- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज नवा उच्चांक गाठत आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयात रुग्णांना भरती करण्यासाठी खाटा शिल्लक नसल्याने मंगल कार्यालय ताब्यात घेऊन तिथे कोविड सेंटर तयार करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत, याबाबत मंगल कार्यालय चालकांना तसे पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र याबाबत मंगल कार्यालय चालकांना याबाबत कुठलीच पूर्व कल्पना दिली नसल्याचे समोर आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सक्रिय रुग्णांचा आकडा 16 हजारांच्या वर गेल्याने लक्षण नसलेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी शहरातील 31 मंगल कार्यालय पहिल्या टप्प्यात ताब्यात घेण्यात आले आहेत. तसे पत्र संबंधित मंगलकार्यालय चालकांना पत्र देण्यात आले. या निर्णयाला विरोध नाही, माणुसकी म्हणून मदत करायला तयार आहोत. मात्र, निर्णय घेण्याआधी मंगलकार्यालय चालकांना विश्वासात घेऊन पूर्व कल्पना देणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही, अशी खंत असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शेळके आणि सचिव विलास कोरडे यांनी व्यक्त केली.
31 मंगल कार्यालयात सुरू होणार कोव्हिड सेंटर हेही वाचा-'पंतप्रधानांना बांग्लादेशात कोणत्या जेलमध्ये ठेवले होते?'
मंगल कार्यालयात कोविड सेंटर, मग विवाह कुठे करायचे....
मंगल कार्यालयात कोविड सेंटर सुरू करण्यास हरकत नाही. मात्र, मार्च ते मे महिना याकाळात विवाह तिथी अधिक असतात. त्यामुळे याच काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मागील वर्षी याच काळात टाळेबंदी असल्याने विवाह होऊ शकले नाहीत. 11 मार्च ते चार एप्रिल याकाळात विवाह सोहळे बंदी असल्याने काही विवाह एप्रिलच्या शेवटी ठरविण्यात आले आहेत. त्यात एप्रिल आणि मे महिन्यातील आगाऊ बुकिंग काही जणांनी केल्या आहेत. कोविड सेंटर सुरू करण्यासाठी तातडीने अधिग्रहण केले. रुग्ण संख्या वाढत असल्याने कोविड सेंटर गरजेची असली तरी मंगल कार्यालयात नियोजित विवाह सोहळे कधी करायचे? हा प्रश्न मंगल कार्यालय चालकांनी उपस्थित केला.
हेही वाचा-संजय राऊतांचे घुमजाव; पवार-शाह गुप्त भेट झालीच नसल्याची दिली प्रतिक्रिया
खर्च भागवयाचा तरी कसा....
मंगल कार्यालयात सोहळे करण्यास परवानगी मिळाली नाही तर कार्यालयाचा खर्च भागवायचा कसा असा प्रश्न असोसिएशनने उपस्थित केला आहे. मागील वर्षी व्यवसाय नसताना पालिकेचा कर भरावा लागला. त्यात ऐन उमेदीच्या काळात ज्यावेळी वर्षभरातील सर्वात जास्त व्यवसाय होतो. त्यावेळी पहिल्या वर्षी बंदमुळे कोविड सेंटरमुळे जर व्यवसाय होणार नसेल तर येणार विजेचे बिल, कर्मचाऱ्यांचे वेतन, पालिकेचा मालमत्ता कर भरायचा कसा हा प्रश्न आहे. त्यात पालिकेने मंगल कार्यालय ताब्यात घेताना चालकांना त्याचा मोबदला किंवा करसवलत मिळणार आहे का? कोविड सेंटर चालवताना येणार विजेचे बिल किंवा इतर खर्च कोण करणार, असे अनेक प्रश्न आहेत. आतादेखील आम्ही सहकार्य करणार आहोत. मात्र, आधी चर्चा करून मग निर्णय घेतला असता तर योग्य झाले असते, असे मत मंगल कार्यालय चालक संघटनेने व्यक्त केले.