औरंगाबाद - कोरोना विषाणूला निर्बंध घालण्यासाठी लसीकरण गरजेचे (corona vaccination)असले तरी, नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवत आहे. त्यामुळे, राज्यभर औरंगाबाद पॅटर्न (aurangabad pattern) राबवणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राज्यात रंगली आहे. मात्र, त्याबाबत कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही, लसीकरण करणे हा सर्वस्वी ऐच्छिक विषय असून, त्याबाबत जबरदस्ती करण्यात येणार नाही. मात्र, आम्ही जनजागृती करू, असे मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -VIDEO : सेना आमदाराचे ग्रामसेवकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, 22 हजार ग्रामसेवक आक्रमक
हा आहे औरंगाबाद पॅटर्न
औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी काही दिवसांपूर्वी नवीन नियमावली जारी केली होती. त्यामध्ये शासकीय, निमशासकीय, खासगी क्षेत्रातील अधिकारी - कर्मचाऱ्यांना लसीकरण सक्तीचे (corona vaccination compulsory) करण्यात आले आहे. लस घेतली तरच डिसेंबर महिन्यात वेतन मिळेल, प्रवास करण्यासाठी मुभा, पर्यटनस्थळांवर प्रवेश, रेशन धान्य दुकानांवर मिळणाऱ्या सुविधा मिळतील, असे या नियमावलीत सांगण्यात आले होते. त्याचबरोबर, रोज लागणारे इंधन देखील लस घेतली असेल तरच मिळेल, अन्यथा या सर्व सुविधा मिळणार नाहीत, असा औरंगाबाद पॅटर्न तयार करण्यात आला आहे.