औरंगाबाद -कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीला पन्नास हजारांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश प्रशासनाने दिल्यानंतर एक नवा पेच निर्माण झाला आहे. मृतांपेक्षा मदत मागणाऱ्यांची संख्या तीन पट अधिक असल्याने औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने समोर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता आलेल्या अर्जांची छाननी करून शहानिशा करण्याचे काम करावा लागत आहे.
- मृतांपेक्षा तीन पट अधिक अर्ज
मागील दीड वर्षांपासून कोरोनाचे थैमान अनुभवायला मिळत आहे. त्यात दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या अधिक होती. अक्षरशः अंत्यविधीसाठी स्मशान भूमीत जागा शिल्लक नसल्याने मिळेल त्या जागी अंत्यविधी कारावे लागत होते. महानगरपालिका हद्दीत 1 हजार 980 नागरिकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्याचे निर्देश देताच मृतांच्या वारसांनी अर्ज दाखल केले. त्यात मात्र मोठी तफावत असल्याच दिसून आले. पालिकेकडे मदत मिळवण्यासाठी जवळपास 5 हजार 346 अर्ज प्राप्त झाल्याने खरे अर्ज किती? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- अर्जाची शहानिशा सुरू