औरंगाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा अवमान केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री संसदेत ( congress agitation against PM Speech ) गप्प बसले होते. त्याचा धिक्कार करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने क्रांती चौक येथून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडांच्या घरावर मोर्चा ( Congress protests at Bhagwat Karads house ) काढण्यात आला. मोर्चाला परवानगी नसल्याने मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी रस्त्यात अडवले.
कोरोना काळात महाराष्ट्राने केलेल्या कामाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचे आभार मानायला हवे होते. परंतु त्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ( Congress slammed PM Modi ) केला. काँग्रेसचा कोरोना स्प्रेडर ( Congress as corona spreader ) म्हणून पंतप्रधानांनी उल्लेख केला होता, त्याचा काँग्रेसने निषेध व्यक्त केला.
हेही वाचा-ST Employee Strike : कोल्हापुरात एसटी कर्मचारी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार भव्य मोर्चा
जशास तसे उत्तर देऊ भाजप-
केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार असल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. जशास तसे उत्तर देण्यास आम्ही देखील सज्ज असल्याचे भाजपच्या पदाधिकार्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.
हेही वाचा-Road Romeo Slapped Belt : रोड रोमियोला छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीने दिला पट्ट्याने चोप; पाहा व्हिडिओ
वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा पोलिस बंदोबस्त
मोर्चे दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी क्रांती चौक येथे तळ ठोकून आहेत.