औरंगाबाद - आम्ही तुमच्याकडे सत्ता मागायला आलो नव्हतो, तुम्ही आमच्याकडे आले होते हे लक्षात ठेवावे. आमची आघाडी विपरीत परिस्थितीमध्ये झाली होती. आमची नैसर्गिक आघाडी नाही हे सत्य आहे. हे साधं बोलायला विचारायला तयार नाहीत. आमची काही नैसर्गिक युती नाही, चर्चांकरून निर्णय घ्यायला हवा, आम्ही अजूनही चर्चेला तयार आहोत. विधानसभेत राष्ट्रवादी विरोधीपक्ष नेते झाले, विधान परिषद नेता आम्हाला हवा होता. बसून निर्णय घेता आला असता. मात्र, आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि नेता निवडला, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी महाविकास आघाडी फुटींचे संकेत दिले ( nana patole on mahavikas aghadi ) आहेत.
आम्हाला विचारलं जात नसेल तर -नाना पटोले प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, पहाटेचे सरकार पडले तेव्हा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते, म्हणून आम्ही सरकार मध्ये आलो. आमची आघाडी काही पर्मनंट आघाडी नाही. आमची आघाडी नैसर्गिक आघाडी नाही, विपरीत परिस्थितीत आम्ही आघाडी केली होती. आम्हाला विचारलं जात नसेल तर आम्ही चर्चा करू, असं वक्तव्य करत नाना पटोलेंनी महाविकास आघाडीत नाराजी नाट्य असून लवकरच आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.