महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Congress Dung Throwing Agitation : बबनराव लोणीकर यांच्या बंगल्यावर काँग्रेसचे शेणफेक आंदोलन - Babanrao Lonikar Viral Audio Clip

थकीत बिलापोटी विज खंडित करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती असा एक ऑडियो क्लिप व्हायरल होत होता. यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या घरावर शेण फेकून आपला रोष व्यक्त ( Congress Dung Throwing Agitation ) केला. लोणीकर यांच्या सारख्या जबाबदार व्यक्तीने असे बोलणे निषेधार्य असल्याचे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले.

Congress Dung Throwing Agitation
लोणीकर यांच्या बंगल्यावर शेणफेक आंदोलन

By

Published : Mar 31, 2022, 7:35 PM IST

औरंगाबाद - थकीत बिलापोटी विज खंडित करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती असा एक ऑडियो क्लिप व्हायरल होत होता. यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या घरावर शेण फेकून आपला रोष व्यक्त केला. लोणीकर यांच्या सारख्या जबाबदार व्यक्तीने असे बोलणे निषेधार्य असल्याचे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले.

बबनराव लोणीकर यांच्या बंगल्यावर काँग्रेसचे शेणफेक आंदोलन

बबनराव लोणीकरांनीदिले होते स्पष्टीकरण -भाजपा आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर ( Bjp Mla Babanrao Lonikar ) यांच्या बंगल्याचे साडेतीन लाख रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरणने वीज कापली. त्यामुळे आमदार महोदयांनी चक्क अभियंत्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ( Babanrao Lonikar Viral Audio Clip ) होती. मात्र, त्यावर आता बबनराव लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिले ( Babanrao Lonikar Viral Audio Clip Clarification ) आहे. औरंगाबादमध्ये माझा एक बंगला आहे. त्याचे बिल भरले असून वीज खंडित झालेली नाही. कोणीतरी खोटी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर टाकून मला बदनाम करत आहे. सध्या महावितरण करत असलेली कारवाई चुकीची असून, त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, असे स्पष्टीकरण लोणीकर यांनी दिले आहे.


काँग्रेसचे आंदोलन -बबनराव लोणीकर यांनी मागासवर्गीय समाजाबद्दल अपशब्द वापरले असा आरोप करत, हया वक्तव्या चा निषेध म्हणून युवक काँग्रेस तर्फे बबनराव लोणीकर यांच्या सातारा परिसर औरंगाबाद येथे त्यांच्या घरावर शेण फेकून निषेध करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव डॉ निलेश आंबेवाडीकर अनुराग शिंदे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष विजय कांबळे, गुरमित गिल,आकाश रगडे, मयुर साठे, विनोद उंटवाल ई पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

काय आहे प्रकरण?सध्या थकीत वीज बिल वसूली जोरात सुरु आहे. थकीत बिल न भरणाऱ्या लोकांची वीज कापण्यात येत आहे. औरंगाबाद मध्ये भाजपा आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या बंगल्याचे साडेतीन लाख रुपये बिल बिल थकल्याने महावितरणने वीज कापली. त्यामुळे आमदार महोदय भडकले थेट त्यांनी थेट अभियंत्याला शिवीगाळ केली. चोरांना पकडत नाही आणि बिल भरणाऱ्याला त्रास देतात. माजले का तुम्ही या शब्दांत त्यांनी अभियंत्याला सुनावले. इतकेच नाही तर तुमच्यावर आयकर विभागाची धाड टाकेल. तुमची प्रॉपर्टीची कुंडली काढणार, ऊर्जा मंत्री माझे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांना सांगून तुम्हाला निलंबित करेल, असे बबनराव लोणीकर यांनी सुनावल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.



हेही वाचा -Babanrao Lonikar Viral Audio Clip : बबनराव लोणीकरवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details