महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महाविद्यालय झाले सुरू, किती विद्यार्थ्यांनी दोन डोस घेतले याची माहिती नाही - aurangabad

दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महाविद्यालय आजपासून (दि.20) सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोनही डोस घेतलेले असावे, असा नियम करण्यात आला आहे. मात्र, महाविद्यालयांना किती विद्यार्थ्यांनी दोन डोस घेतले याबाबत माहिती महाविद्यालयाकडे नसल्याने, प्रमाणपत्र तपासणी करण्याची वेळ आली आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Oct 20, 2021, 4:22 PM IST

औरंगाबाद- दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महाविद्यालय आजपासून (दि.20) सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोनही डोस घेतलेले असावे, असा नियम करण्यात आला आहे. मात्र, किती विद्यार्थ्यांनी दोन डोस घेतले याबाबतची माहिती महाविद्यालयाकडे नसल्याने, प्रमाणपत्र तपासणी करण्याची वेळ आली आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

महाविद्यालयांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

दीड वर्षानंतर महाविद्यालय बुधवारी सुरू करण्यात आले. विद्यार्थी महाविद्यालयात येताच त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी प्रवेश द्वारावर रांगोळी काढण्यात आली होती. त्यांचे शाररिक तापमान तपासणी करुन त्यांना फुल देऊन वर्गात प्रवेश देण्यात आला. शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार एक बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे विद्यार्थ्यांना बसवण्यात आले.

लसीकरणाबाबत माहिती नाही

महाविद्यालय सुरू करत असताना शासनाने काही नियम लावले आहे. त्यात विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असणे अनिवार्य करण्यात आले आहेत. मात्र, याबाबत महाविद्यालयांमध्ये संभ्रमावस्था आहे. किती विद्यार्थ्यांनी दोन डोस घेतले याबाबत अद्यावत माहिती महाविद्यालयांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे ही माहिती जमा करण्याचे काम केले जात आहे. पहिल्या दिवशी प्रवेश द्वारावर लसीकरण प्रमाणपत्र तपासण्यात आले. एक डोस घेणाऱ्यांनाही महाविद्यालयात येण्याची परवानगी द्यावी, असे मत वसंतराव नाईक महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. संजय शिंदे यांनी व्यक्त केले.

लसीकरणाच्या अटीमुळे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची दांडी

महाविद्यालयात प्रवेश देताना कोरोना लसीचे दोन डोस अनिवार्य करण्यात आल्याने अनेक विद्यार्थी महाविद्यालयात आले नसल्याचे दिसून आले. अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांचा एक डोस झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याबाबत महाविद्यालय प्रयत्न करणार आहेत. पुढील काही दिवसात लसीकरण होईल त्याप्रमाणे विद्यार्थी संख्या वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा -'ढ' आहेस असे म्हणत असल्याने प्राध्यापक वडिलांची अल्पवयीन मुलाकडून हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details