औरंगाबाद -मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची औरंगाबदमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेत पाणीप्रश्नावरुन शिवसेनेवर टीका करणाऱ्यांचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे. मी असा मूर्ख राजकारणी आहे, जो या पाणी प्रश्नाला भिडतो आहे. कारण माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता निधी मंजूर केलाय, वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न दाखवता तुरुंगात टाकणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला ( uddhav thackeray on aurangabad Water scheme ) आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शस्त्रक्रिया झाल्यानंतर ६ महिन्यांनी मुंबईबाहेर पाऊल टाकलं. हे पहिलं पाऊल मराठवाड्यात टाकलं. आजचा दिवस म्हणजे शिवसेनेने मराठवाड्यात पहिलं पाऊल टाकल्याचा आहे. एवढ्या वर्षांनीही शिवसेनेची ताकद तेवढीच आहे. उलट वाढत आहे. मैदानात बसायला जागा नाही. तुमच्या रुपाने तुळजाभवानीचं रुप पाहतो आहे.
मी पहिल्यांदा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहे. मी पाणी प्रश्न असताना त्याकडे तोंड फिरवणार नाही. . मी असा मूर्ख राजकारणी आहे, जो या पाणी प्रश्नाला भिडतो आहे. कारण माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता निधी मंजूर केलाय, वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न दाखवता तुरुंगात टाकणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
'तुम्ही पाच वर्षे मुख्यमंत्री होता का...' - संभाजीनगर कधी करणार प्रश्न विचारतात. माझ्या वडिलांनी शिवसेना प्रमुखांनी शब्द दिलाय. तो लक्षात आहे. मंत्रिमंडळाने ठराव पास करून दिलाय, सध्या विमानतळाला नाव देण्याचा प्रस्ताव पण दिलाय. संभाजी महाराजांच्या नावाला शोभेल, असं शहर करेल. आरोप करणाऱ्यांनी आधी केंद्रातून विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करून आणावा, आम्ही सत्कार करू. मध्ये कोणीतरी आक्रोश मोर्चा काढला, तो पाण्याचा नाही, तर सत्ता गेल्याचा आक्रोश होता. तुम्ही पाच वर्षे मुख्यमंत्री होता का प्रश्न सोडवला नाही?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे.