औरंगाबाद- आमच्या यात्रेसाठी मैदान पूरत नाही तर त्यांच्या यात्रेमध्ये मंगलकार्यालयही भरत नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. फुलंब्री येथे आयोजित महाजनादेश यात्रेसाठीच्या सभेत बोलत होते.
आमच्या यात्रेसाठी मैदान पूरत नाही, त्यांच्या यात्रेमध्ये मंगल कार्यालयही भरत नाही - मुख्यमंत्री - काँग्रेस
आमच्या यात्रेसाठी मैदान पूरत नाही तर त्यांच्या यात्रेमध्ये मंगलकार्यालयही भरत नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.
![आमच्या यात्रेसाठी मैदान पूरत नाही, त्यांच्या यात्रेमध्ये मंगल कार्यालयही भरत नाही - मुख्यमंत्री](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4271009-451-4271009-1567002100862.jpg)
ते पुढे म्हणाले, जनतेला विकास हवा आहे. ईव्हीएमला दोष देण्याऐवजी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले आत्मचिंतन करावे लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही विरोधीपक्ष नेताही होणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महाराष्ट्राची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहे. जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपला बहुमत मिळत आहे. विरोधक ईव्हीएमला दोष देत आहेत. १० वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ईव्हीएमच्या जोरावरच सत्ता मिळवली होती. त्यावेळी आम्ही काही बोललो नाही, ईव्हीएमला दोष देण्याऐवजी विरोधकांनी आत्मचिंतन करावे, पराजय पत्करल्यानंतरही विरोधक जनतेत जात नाहीत. संवाद साधत नाहीत. त्यांनी आत्मचिंतन करावे. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोधीपक्ष नेताही बनू शकत नाही. लोकसभेसारखे विधानसभेत हाल होणार आहे, असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर सरकाच्या विविध योजना व विकासकामांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, किरीट सोमय्या, डॉ.भागवत कराड यांसह अनेक नेते मंचावर उपस्थित होते.