महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Eknath Shinde on Marathwada Liberation Day : मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध; अनेक प्रकल्प नव्याने करणार - मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Many Projects will be Done A Fresh

आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी सात वाजेच्यादरम्यान सिद्धार्थ उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न ( CM Eknath Shinde on Marathwada Liberation Day ) झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा ( CM Shinde Said Government Committed for Development of Marathwada ) दिल्या.

CM Eknath Shinde on Marathwada Liberation Day
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन

By

Published : Sep 17, 2022, 12:52 PM IST

औरंगाबाद : मराठवाड्यासाठी अनेक प्रकल्प नव्याने करणार, पश्चिमी नद्यांचे पाणी मराठवाड्यासाठी वळवणार, लोकांना अपेक्षा असणारे निर्णय घेण्याचा प्रयत्न असेल. एमआयडीसीमधील भूखंड वाटपाची चौकशी करून नवीन उद्योगांसाठी जास्तीत जास्त सवलती देऊन नवीन येणाऱ्या उद्योगांना सवलती व एक खिडकी ( CM Eknath Shinde on Marathwada Liberation Day ) योजनेच्या माध्यमातून सर्व परवाने देण्यावर अधिक भर दिला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ( CM Shinde Said Government Committed for Development of Marathwada ) दिली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन निमित्त हैद्राबादमध्ये कार्यक्रम :मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कार्याक्रमांनतर मुख्यमंत्री हैदराबादला रवाना झाले. तिथे देशाचे गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थित कार्यक्रम होणार आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामाशी संबंधित महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये एक संयुक्त कार्यक्रम होणार आहे, असेदेखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सर्व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण :आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी सात वाजेच्यादरम्यान सिद्धार्थ उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मराठवाड्याच्या गावागावांमध्ये हा संग्राम लढला गेला : मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. निजामांच्या तावडीतून मराठवाड्याची सुटका व्हावी, यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्यांना मानवंदना देण्यासाठी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जातो. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्त्वाखाली मुक्तिसंग्रामाचा लढा लढला गेला होता. मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला.

मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना केले अभिवादन :मुक्तिसंग्रामात स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे मोलं कुणीच करू शकत नाही, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृतमहोत्सवी आणि ऐतिहासिक दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी सगळ्यांना शुभेच्छा देत ज्ञात, अज्ञात सगळ्यात स्वातंत्र्यसैनिकांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.

मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध :मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध आहे, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये घृणेश्वर मंदिराच्या विकासासाठी 157 कोटी त्यासोबत रस्ते आणि रेल्वे मार्गाने मराठवाड्याला जोडण्यासाठीची विकासकामेही वेगाने व्हावीत, यासाठी भरीव तरतूद केली असल्याचे त्यांनी म्हटले. मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटवण्यासाठी, दुष्काळ संपवण्यासाठी, पश्चिमी नद्यांचे पाणी वळवण्यासाठी आणि मराठवाड्याच्या विकासाला वेग मिळावा, यासाठी सरकार काम करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आश्वस्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details