महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aurangabad Became EIE City : गुगलव्दारे शहराचा वाहतूक डेटा सार्वजनिक; औरंगाबाद बनले देशातील पहिले ईआयई शहर - संजय गुप्ता

बुधवारी नवी दिल्ली येथे संजय गुप्ता ( Sanjay Gupta ) (कंट्री हेड, गुगल, इंडिया) यांच्या अध्यक्षतेखाली एन्व्हायर्नमेंटल इनसाइट्स एक्सप्लोरर डेटा प्रकाशित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गुगलने औरंगाबाद शहरासाठी EIE डेटा ( Google Released EIE Data ) लाँच केला. ( Aurangabad Traffic Data ) औरंगाबादचे हवामान बदल विभागाचे साहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक ( Assistant Project Manager ) आदित्य तिवारी ( Aditya Tiwari ) यांनी प्रतिनिधित्व केले.

Aurangabad City
औरंगाबाद शहर

By

Published : Jul 28, 2022, 10:48 AM IST

औरंगाबाद : गुगलने एन्व्हायर्नमेंटल इनसाइट्स एक्सप्लोरर (EIE) ( Environmental Insights Explorer ) डेटा प्रकाशित केला आहे. बुधवारी नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात औरंगाबादचा वाहतूक डेटा ( Aurangabad Traffic Data ) सार्वजनिकरित्या लाँच करण्यात आला. औरंगाबाद हे भारतातील पहिले शहर ( Aurangabad Became First City ) ठरले आहे. गुगलद्वारे वाहतूक डेटा सार्वजनिकपणे प्रसिद्ध करण्यात येणारे औरंगाबाद हे भारतातील पहिले शहर म्हणून निवडले गेले आहे.

औरंगाबाद शहर

औरंगाबाद देशातील पहिले शहर : गुगलकडे एन्व्हायर्नमेंटल इनसाइट्स एक्सप्लोरर (EIE) नावाचे एक फिचर आहे. जे शहरांना कार्बन उत्सर्जन स्त्रोतांचे मोजमाप करण्यास, विश्लेषण करण्यास, उत्सर्जन कमी करण्यासाठी धोरणे तयार करण्यास मदत करते. ज्यामुळे वायू प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होते. भारतामध्ये गुगलचे हे EIE फिचर केवळ बँगलोर, चेन्नई, पुणे आणि औरंगाबादसाठी उपलब्ध आहे. या चार शहरांपैकी औरंगाबाद हे भारतातील पहिले शहर म्हणून निवडले गेले आहे. हा डेटा शहरांचा हवामान कृती आराखडा तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.

औरंगाबाद शहर

दिल्लीच्या बैठकीत झाली निवड :बुधवारी नवी दिल्ली येथे संजय गुप्ता ( Sanjay Gupta ) (कंट्री हेड, गुगल, इंडिया) यांच्या अध्यक्षतेखाली लॉन्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गुगलने औरंगाबाद शहरासाठी EIE डेटा लाँच केला. औरंगाबाद स्मार्ट सिटीचे हवामान बदल विभागाचे साहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक ( Assistant Project Manager ) आदित्य तिवारी यांनी ( Aditya Tiwari ) या कार्यक्रमात औरंगाबादचे प्रतिनिधित्व केले.

हा अभिमानाचा क्षण :पर्यावरण आणि समाजाच्या उन्नतीसाठी गुगलच्या सहकार्याने काम करणे हा औरंगाबादकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे. "गुगलद्वारे डेटा प्रकाशित करण्यात येणारे औरंगाबाद हे भारतातील पहिले शहर झाल्यामुळे औरंगाबाद इतर शहरांसाठी नेतृत्वाची भूमिका पार पाडत आहे." EIE डेटा प्रशासन, संशोधक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांना रणनीती बनवण्यासाठी, कार्बन उत्सर्जन मोजण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी मदत करेल जेणेकरून कार्बन फूटप्रिंटवर नियंत्रण ठेवता येईल.

येणाऱ्या पिढीसाठी EIE डेटा उपयुक्त : पुढील भावी पिढीसाठी पुढील 30 ते 40 वर्षे शाश्वत वातावरण तयार करण्यासाठी हा EIE डेटा उपयुक्त ठरेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या रेस टू झीरो आणि रेस टू रेझिलन्स मोहिमेसाठी औरंगाबादच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने हा विकास आहे, अशी प्रतिक्रिया औरंगाबाद महानगपालिका आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले.

केंद्र सरकार अगोदर गुगलकडून झाले होते औरंगाबादचे नामकरण :शहराच्या नामांतराचा वाद पेटलेला असताना गुगलवर शहराच्या नावाचा उल्लेख संभाजीनगर ( Aurangabad Renamed Issues ) असा करण्यात आला होता. सर्चमध्ये औरंगाबाद असे टाकल्यास संभाजीनगर असादेखील उल्लेख आढळून ( Aurangabad Renamed Sambhaji naga ) येत होता. या आधी टाटा समूहाच्या क्रोमा या बँड मधे शहराचे नाव बदलण्यात आले होते. त्यामुळे केंद्रांचे नाव बदलला हिरवा कंदील देण्याआधीच असे बदल होत असल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वादंग निर्माण झाल्यानंतर हटवले संभाजीनगर नाव : गुगल सांकेतिक स्थळावर काहीही माहिती हवी असल्यास अचूक माहिती आपल्याला मिळते. त्यात शहरांची नाव असो की एखादा पत्ता त्याची माहिती दिली जाते. त्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. याच प्रणालीत बदल करण्यात आल्याने आता औरंगाबाद असे टाकल्यावर संभाजीनगर असा उल्लेख येऊ लागल्यानंतर वाद निर्माण झाले. त्यानंतर गुगलने संभाजीनगर नाव हटवून पूर्ववत औरंगाबादच ठेवले.

हेही वाचा :Ajit Pawar Criticized : राज्याचा कारभार वाऱ्यावर सोडला; शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत : अजित पवारांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details