महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Shinde: आता आठ वाजताचा भोंगा बंद झाला, मुख्यमंत्र्यांची राऊतांच्या अटकेवर मिश्किल टिप्पणी - Shinde commented on Sanjay Raut arrest

मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच औरंगाबद दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी रॅली काढली. काही ठिकाणी शक्तिप्रदर्शन केले. ( Eknath Shinde visit to Aurangabad ) या संपुर्ण दौऱ्यात त्यांच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात लोकांनी उपस्थिती दर्शवली. त्यावर त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच, खासदार संजय राऊत यांच्या अटकेवरही प्रतिक्रिया दिली आहे.

मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Aug 1, 2022, 3:46 PM IST

औरंगाबाद - आता आठ वाजताचा भोंगा बंद झाला आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असताना समर्थक ( CM commented on Sanjay Raut arrest ) आमदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयाला भेट दिली त्यावेळी उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना आवाज येतोय ना असा प्रश्न विचारत आठ वाजताचा भोंगा बंद झाला, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंनी संजय राऊत यांनी नाव न घेता लगावला आहे.

औरंगाबाद येथे बोलताना मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागरिकांचे मानले आभार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी मध्यरात्री देखील त्यांनी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संवाद साधत असताना इतक्या रात्री आपल्यासाठी थांबलात त्यामुळे त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर, प्रत्येकवेळी त्यांनी आपली भूमिका योग्य होती ना? असा प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला. शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला हे पाऊल उचलावे लागले. आपली भूमिका योग्य असल्यामुळेच आपल्याला लोकांचे प्रेम मिळत आहे असही ते म्हणाले आहेत. आता जनतेच्या विकासासाठी काम करणार असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित त्यांना दिले.

पंतप्रधानांचे मानले आभार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रत्येक भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत. सत्ता परिवर्तन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपल्याला महाराष्ट्राच्या विकासात मदत करण्याचे आश्वासन दिल आहे असे त्यांनी सांगितले आहे. हे सरकार सर्व सामान्य नागरिकांचे सरकार असणार आहे. त्यामुळे मिळालेल्या मदतीमुळे महाराष्ट्राची वाटचाल चांगली करण्यास मदत होईल. तसे, आपण निश्चित प्रयत्न करू असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा -संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.. स्वप्ना पाटकर प्रकरणात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details