महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chandrasekhar Bawankule : उध्दव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर बोलू नये, चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा - चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमीत शाह यांच्या बाबत वक्तव्य करु नये, असा इशारा उध्दव ठाकरे (Chandrasekhar Bawankule critisize on Uddhav Thackeray) यांना दिला.

Chandrasekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे

By

Published : Sep 23, 2022, 5:38 PM IST

Updated : Sep 23, 2022, 8:00 PM IST

औरंगाबाद - उध्दव ठाकरे यांनी शब्द जपून वापरावे. अमीत शाह यांच्या बाबत त्यांनी बोलणं म्हणजे सूर्यसमोर दिवा लावणे. त्यांनी वक्तव्य करताना विचार करावा, अमीत शाह कधीही त्यांचं नाव घेत नाहीत, चर्चा करत नाहीत. अमीत भाई मुंबईत आल्यावर इतका धसका का घेता. उध्दव ठाकरे हे नैराश्यातून वक्तव्य करत आहेत. जे राहील आहे ते सांभाळून ठेवा. नाही तर ते पण एकनाथ शिंदे घेऊन पळतील, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule critisize on Uddhav Thackeray) यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

उध्दव ठाकरे घाबरले आहेत :खातेवाटप मुख्यमंत्री ठरवतात. त्यामुळे कोणाला मंत्रिपद द्यायचे आणि कोणाला नाही हे ठरवतात. त्यामुळे त्यांच्यात कोण नाराज आहे, याबाबत आम्ही सांगू शकणार नाही. मात्र काही आमदार नाराज असल्याचा प्रपोगंडा तयार केला जातोय. रोज सकाळी कोण येणार? कोण येणार? या बाबत पाहिलं जात. उध्दव ठाकरे रोज घाबरून भाषण करत आहेत. अजून काही लोक आमच्याकडे येणार असल्याने त्यांची भीती वाढली आहे. राज्याला काम करणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. उध्दव ठाकरे यांनी आपला पक्ष सांभाळावा तो वाढवावा. अन्यथा राहिलेले देखील शिंदे घेऊन जातील अशी टीका, चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.



निवडणुकीला आम्ही तयार :कोणतीही निवडणूक लागल्यास आम्ही तयार, एकनाथ शिंदे यांच्या सोबतच निवडणूक लढवणार आहोत. पक्षाला बहुमत मिळाला की पक्ष मोठा झाला ते कळतं. ग्रामपंचायत निवडणुकीत २९४ जागांवर आमचा सरपंच निवडून आला. त्यांच्या नावानिशी माहिती आहे. काही पक्ष दावा करतात त्यांनी माहिती द्यावी. आमच्या सोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना यश मिळालं. म्हणजे आमच्या सरकारने घेतलेला निर्णय जनतेला मंजूर होत आहेत. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडणूक आणण्याचा मानस आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं. सरकारच्या योजना पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मागील सरकारने जो कारभार केला त्यानंतर सरकार आलं मागील अडीच वर्ष राज्यात सरकार नव्हत, आता बुलेट ट्रेन सरकार आले आहे, असं कौतुक देखील बावनकुळे यांनी केले.


राज ठाकरे दिलदार आणि मैत्री करता येईल असा नेता आहे. माझे चांगले संबंध असल्याने आमचं त्यांच्या घरी येणं जाणं आहे. मात्र युतीबाबत चर्चा नाही. उध्दव ठाकरे दिलदार नाहीत का? याबाबत बोलताना आम्ही इतके दिवस दिलदार पणा दाखवला अस म्हणून भाष्य करणे टाळले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याला मोदीजी शाह यांना बोलावलं असेल तर आनंद आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं.



काँग्रेसने केला अपप्रचार :राष्ट्रीय स्वयंसेवक प्रमुख मोहन भागवत यांनी पहिल्यांदाच मशिदिस भेट दिली. त्यानंतर त्यांना राष्ट्रपिता अस संबोधण्यात आले. त्यावर बोलताना बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. काँग्रेसने आज पर्यंत भाजप विषयी मुस्लिम समाजात अपप्रचार करत मत मिळवली. भाजप आला तर तुम्हाला पाकिस्तान मध्ये पाठवतील किंवा मारतील अस सांगून त्यांनी मत मिळवली, अस बावनकुळे यांनी सांगितलं.

Last Updated : Sep 23, 2022, 8:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details