औरंगाबादगंगापूर तालुक्यातील बुट्टेवाडगाव ते शंकरपूर या रस्त्यावर चारशे मीटर दरम्यान असलेले अतिक्रमण मोकळे to clear the road करण्यासाठी, परिसरातील गावकऱ्यांनी विद्यार्थ्यासह students and villagers गंगापूर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी दिवसभर साखळी उपोषण Chain hunger strike केले. बुट्टे वडगाव ते शंकरपूर रस्त्याने जाण्यासाठी असलेल्या मार्तंड नदीला पार करण्याकरता चारशे मीटर रस्त्याची अडचण आहे. या परिसरात सातशेहुन अधिक कुटुंबे वास्तव्यास राहतात. त्यांच्या दळणवळणासाठी, शेती कामासाठी, शेतमाल ने आण करण्यासाठी मोठी अडचण होत आहे.
विद्यार्थ्यांनचे होत आहे शैक्षणिक नुकसान,प्रशासनाचे दुर्लक्षपरिसरातील साठ हून अधिक शालेय विद्यार्थी या रस्त्याने रोजच ये जा करत असतात. पावसाळ्यात मार्तंडी नदीला पाणी येत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही रस्ता मोकळा करून देत नसल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी गंगापूर तहसील परिसरात विद्यार्थ्यांसोबत साखळी उपोषण सुरू केले.