महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'राज्याची गाडी एक, मात्र स्टेअरिंग दोघांच्या हाती, कुठंपर्यंत जाईल माहिती नाही' - रावसाहेब दानवे ऑन स्टेअरिंग

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्तेच्या गाडीचे स्टेअरिंग कोणाच्या हातात? यावर चांगलीच चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला अजित पवार यांनी एक फोटो सोशल मीडियावर टाकून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोमध्ये एका गाडीमध्ये अजित पवार आणि उद्धव ठाकरे सोबत बसलेले असताना मात्र, स्टेअरिंग सीटवर अजित पवार असल्याचा हा फोटो होता.

raosaheb danave
रावसाहेब दानवे - केंद्रीय राज्यमंत्री

By

Published : Jul 31, 2020, 8:17 PM IST

औरंगाबाद- राज्यात गाडी एक आणि स्टेअरिंग मात्र दोघांच्या हातात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गाडी कुठपर्यंत चालेल याचा नेम नाही. त्यामुळे राज्याच्या कारभाराचे स्टेअरिंग एकाच्याच हाती असावे म्हणजे राज्याचे आणि प्रामुख्याने शेतकर्‍यांचे प्रश्न सुटतील, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद येथे केली.

शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. सर्वांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी आणि आपली ताकद दाखवावी, त्यानंतरच पाहता येईल. मागच्या काळामध्ये मोदींच्या नावावर मत मागून दुसऱ्यांशी हातमिळवणी करत दगाफटका झाला, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. मात्र, त्याचा विपर्यास केला असे रावसाहेब दानवे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्तेच्या गाडीचे स्टेअरिंग कोणाच्या हातात? यावर चांगलीच चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला अजित पवार यांनी एक फोटो सोशल मीडियावर टाकून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोमध्ये एका गाडीमध्ये अजित पवार आणि उद्धव ठाकरे सोबत बसलेले असताना मात्र, स्टेअरिंग सीटवर अजित पवार असल्याचा हा फोटो होता. मात्र, या फोटोनंतर राजकारणात राज्याचे स्टेअरिंग कोणाच्या हाती? असा प्रश्न उपस्थित होत असताना, मुख्यमंत्री पुण्याच्या दौऱ्यात स्वतः गाडी चालवत असल्याचा एक फोटो समोर आला. त्यामुळे राज्याचे स्टेअरिंग माझ्या हाती अशी चर्चा देखील रंगताना दिसली होती. त्यावर रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या शैलीत चांगलाच समाचार घेतला.

आम्हाला राज्याचे स्टेअरिंग हातात घ्यायची अपेक्षा सध्या नाही. त्यांनी एकत्र राहावं, चांगलं काम करावं, मात्र त्यांच्या आपापसातल्या वादातून जर स्टेअरिंगवरचा हात सुटला तर आम्ही कोणासोबत जाणार नाही. तर निवडणूक लढवू आणि भाजपची एकहाती सत्ता पुन्हा आणू, असे दानवे यांनी सांगितले. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने बाजू व्यवस्थित मांडायला हवी. आम्ही आरक्षण दिले आता ते टिकवण्याचे काम सरकारने करायला पाहिजे. मात्र, सरकार गंभीर नाही अशी टीका केली जाते. आम्ही नाही तर अनेक संघटनांनी सरकारला गांभीर्य नसल्याची टीका केली आहे आम्ही आरक्षण दिले देखील आणि टिकून देखील दाखवलं असल्याचे दानवे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details