महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Brahmin Community On Vinayak Raut : 'शेंडी जानव्याचे राजकारण नको'; विनायक राऊत यांच्या वक्तव्यावर ब्राह्मण समाज संतप्त - औरंगाबाद लेटेस्ट न्युज

शिवसेनेतर्फे 19 खासदार राज्यात शिवसंपर्क अभियान राबवले जात आहे. या मोहिमेत भाजप आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. औरंगाबादेत अभियान राबवत असताना फडणवीस यांच्यावर टीका करत असताना "शेंडी जानव्याचे राजकारण नको" असे वक्तव्य ( MP Vinayak Raut Statement ) केले. त्यावरून राज्यातील ब्राम्हण समाज संतप्त झाला ( Brahmin community angry on MP Vinayak Raut Statement ) आहे.

Brahmin Community On Vinayak Raut
सुरेश देशपांडे

By

Published : Mar 23, 2022, 5:31 PM IST

Updated : Mar 24, 2022, 7:47 AM IST

औरंगाबाद - शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या 'शेंडी जानव्याचे राजकारण नको' ( MP Vinayak Raut Statement ) वक्तव्यावरून ब्राह्मण समाज संतप्त झाला आहे. वारंवार ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याने आता समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा ब्राम्हण समन्वय समिती तर्फे देण्यात आला आहे.शिवसेनेतर्फे 19 खासदार राज्यात शिवसंपर्क अभियान राबवले जात आहे. या मोहिमेत भाजप आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. औरंगाबादेत अभियान राबवत असताना फडणवीस यांच्यावर टीका करत असताना "शेंडी जानव्याचे राजकारण नको" असे वक्तव्य केले. त्यावरून राज्यातील ब्राम्हण समाज संतप्त झाला ( Brahmin community angry on MP Vinayak Raut statement ) आहे.

विनायक राऊत यांच्या वक्तव्यावर ब्राह्मण समाज संतप्त


उद्धव ठाकरे यांना विचारणार जाब -विनायक राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत असताना त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी ब्राम्हण समाजाने केली आहे. असे झालं नाही तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आमचा रोष व्यक्त करू, इतकेच नाही तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा ब्राम्हण समन्वय समितीने दिला. आगामी काळात ब्राम्हण समाजावर कोणत्याही पक्षाने वक्तव्य केले तर सहन केले जाणार नाही असे समन्वय समितीचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी सांगितले.

हेही वाचा -Fadnavis On CM : मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणार नाही - देवेंद्र फडणवीस

Last Updated : Mar 24, 2022, 7:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details