महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मंदिरं उघडण्यासाठी भाजपचे औरंगाबादमध्ये शंखनाद आंदोलन - agitation in Aurangabad

राज्यातील धार्मिक स्थळ उघडा यामागणीसाठी भाजपने गजानन महाराज मंदिर परिसरात आंदोलन केले. हातात शंख घेऊन त्याचा नाद करत झोपलेल्या सरकारला जाग करण्याचा प्रयत्न केल्याचे भाजप अध्यात्म आघाडीचे संजय जोशी यांनी सांगितले. या आंदोलनात गोंधळी सहभागी झाले होते. त्यांनी देखील गोंधळ सादर करत मंदिर उघडण्याची मागणी केली आहे.

मंदिर उघडण्यासाठी भाजपचे औरंगाबादमध्ये आंदोलन
मंदिर उघडण्यासाठी भाजपचे औरंगाबादमध्ये आंदोलन

By

Published : Aug 30, 2021, 4:01 PM IST

Updated : Aug 30, 2021, 8:16 PM IST

औरंगाबाद - राज्यातील धार्मिक स्थळ सुरू करण्याच्या मागणीसाठी आज भाजपतर्फे गजानन महाराज मंदिर समोर शंखनाद आंदोलन करण्यात आले. श्रावण महिना हिंदू बांधवांसाठी पवित्र मानला जातो. मात्र, या महिन्यातही भाविकांना देवाचे दर्शन घेता येत नसल्याने भाजपतर्फे राज्यभर आंदोलन केले.

मंदिर उघडण्यासाठी भाजपचे औरंगाबादमध्ये आंदोलन

गजानन महाराज मंदिर समोर आंदोलन

राज्यातील धार्मिक स्थळ उघडा यामागणीसाठी भाजपने गजानन महाराज मंदिर परिसरात आंदोलन केले. हातात शंख घेऊन त्याचा नाद करत झोपलेल्या सरकारला जाग करण्याचा प्रयत्न केल्याचे भाजप अध्यात्म आघाडीचे संजय जोशी यांनी सांगितले. या आंदोलनात गोंधळी सहभागी झाले होते. त्यांनी देखील गोंधळ सादर करत मंदिर उघडण्याची मागणी केली आहे.

'दारूची दुकान उघडी'

राज्य सरकारने कोरोनाची दुसरी लाट ओसरली म्हणून बाजारपेठ सुरू केल्या, त्याच बरोबर हॉटेल आणि दारूची दुकान देखील सुरू केली. या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना पसरत नाही का? असा संतप्त सवाल भाजपतर्फे उपस्थित करण्यात आला. मंदिर बंद असल्याने परिसरात हार-फुल, हळद कुंकू विक्री करणारे, पूजेचे साहित्य विक्री करणारे यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यांचा विचार कोण करणार असा प्रश्न आंदोलक भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.

महिला आघाडीने केला मंदिर प्रवेश

येथील गजानन महाराज मंदिरासमोर आंदोलन सुरू असताना भाजप कार्यकर्त्यांनी मंदिराच्या बाहेरून आरती केली. त्यानंतर मंदिर प्रवेश करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवले. दरम्यान, भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मंदिर प्रवेश केला. मंदिरात जाऊन महिलांनी देवदर्शन घेतले. मंदिर प्रवेश केलेल्या महिलांना पोलिसांनी बाहेर काढले. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले.

Last Updated : Aug 30, 2021, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details