महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महिला अत्याचाराविरोधात औरंगाबादेत भाजप महिला आघाडीचे आंदोलन - भाजप महिला आघाडी आंदोलन

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या घटना थांबवण्याची जबाबदारी सरकारवर आहे. मात्र असे असताना सरकार हातावर हात धरून बसले असल्याने, महिलांना आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचा आरोप करत, भाजप महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. औरंगाबादच्या क्रांतिचौक भागात भाजप महिला मोर्चातर्फे सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

BJP women's front
महिला अत्याचाराविरोधात औरंगाबादेत मोर्चा

By

Published : Oct 12, 2020, 3:23 PM IST

औरंगाबाद -राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या घटना थांबवण्याची जबाबदारी सरकारवर आहे. मात्र असे असताना सरकार हातावर हात धरून बसले असल्याने, महिलांना आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचा आरोप करत, भाजप महिला आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. औरंगाबादच्या क्रांतिचौक भागात भाजप महिला मोर्चातर्फे सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

महिला अत्याचाराविरोधात औरंगाबादेत मोर्चा

आंदोलनात देवीचे भारुड सादर करत, देवी कोपल्यावर काय होऊ शकते हे देखाव्यातून महिलांनी सादर केले.सरकारने वेळीच लक्ष द्यावे, लक्ष न दिल्यास ठिणगी पडली आहे. वणवा पेटायला वेळ लागणार नाही असा इशारा भाजप महिला आघाडी शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचाराच्या 47 गंभीर प्रकारच्या घटना राज्यात घडल्या. या घटनांचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडण्याची गरज आहे. मात्र हे मुख्यमंत्री घरात दडून बसले आहेत. त्यामुळे अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. या परिस्थितीचा निषेध करावा तितका कमीच आहे. या सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी भाजप महिला आघाडीच्या महिलांनी रस्त्यावर उतरत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पहिल्यांदाच महिला आघाडीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन भाजपने यावेळी केलं. देवीचे भारुड सादर करत देवीचा प्रकोप काय असतो हे सरकारला माहीत आहे त्यांनी सावध व्हावे असा इशारा भाजप तर्फे देण्यात आला. भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी हातात टाळ घेत सरकार विरोधी घोषणाबाजी केली.

क्रांतिचौकात करण्यात आलेल्या या आंदोलनात भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अमृता पालोदकर, माधुरी आदवंत, यांच्यासह खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, यांच्यासह मोठ्यासंख्येने भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details