औरंगाबाद - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे आम्ही वंशज आहोत. औरंगजेबाचे नाही, त्यामुळे औरंगाबादचे नामकरण 'संभाजीनगर'झालेच पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. यापार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते शहरात आले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी आम्ही औरंगजेबाचे वंशज नसल्याने औरंगाबादचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच संभाजीनगर या मागणीवर आमची भाजपची भूमिका स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.