महाराष्ट्र

maharashtra

तत्कालीन वस्तुस्थिती लक्षात घेऊन बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल, अतुल सावे यांची प्रतिक्रिया

By

Published : Sep 30, 2020, 2:51 PM IST

बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपा आमदार अतुल सावे, त्यांचे वडील दिवंगत खासदार मोरेश्वर सावे यांच्यावरही खटला भरला होता. यावर बोलताना 'औरंगाबादहून मोठ्या संख्येने कारसेवक अयोध्येला गेले. मात्र, बाबरी पाडण्याचे नियोजन नव्हते. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. बाबरी पाडणे हा पूर्वनियोजित कट नव्हता. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. हिंदुत्वाचा विजय झाला. वडील आज असते तर, त्यांनाही आनंद झाला असता,' अशी प्रतिक्रिया आमदार सावेंनी दिली.

औरंगाबाद भाजप आमदार अतुल सावे न्यूज
औरंगाबाद भाजप आमदार अतुल सावे न्यूज

औरंगाबाद - बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी आज निकाल जाहीर झाला. या निकालात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मुख्य आरोपींमध्ये औरंगाबादचे माजी खासदार मोरेश्वर सावे यांचा समावेश होता. त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यावर त्यांचे पुत्र भाजपा आमदार अतुल सावे यांनी आनंद व्यक्त केला.

बाबरी मशीद प्रकरणाच्या निकालानंतर आमदार अतुल सावे यांची प्रतिक्रिया
बाबरी पाडणे हा पूर्वनियोजित कट नव्हता, त्यामुळे ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. हा निकाल म्हणजे हिंदुत्वाचा विजय असून माझे वडील मोरेश्वर सावे आज हयात असते तर, त्यांना निश्चित आनंद झाला असता, असे मत आमदार अतुल सावे यांनी व्यक्त केले.

अयोध्येला जात असताना औरंगाबादहून मोठ्या संख्येने कारसेवक गेले होते. त्यावेळी मोरेश्वर सावे देखील गेले होते. त्यावेळी बाबरी पाडण्याचे कुठलेही नियोजन नव्हते. जे काही घडले, ते अचानक घडले. ते न्यायालयाने देखील मान्य केल्याने सत्याचा विजय झाला आहे. राम मंदिराचे भूमीपूजन नुकतेच झाले. या दोन्ही गोष्टींमुळे हिंदुत्वाचा विजय झाला आहे. माझे वडील मोरेश्वर सावे आज असते तर, त्यांना आनंदच झाला असता. आमच्या कुटुंबीयांना आनंद झाला आहे, असे मत आमदार अतुल सावे यांनी सांगितले.

हेही वाचा -कारसेवक म्हणून 13 दिवस तुरुंगात; किशोर जैन यांनी 'त्या' आठवणींना दिला उजाळा

ABOUT THE AUTHOR

...view details