महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्य सरकार पाडण्याची आमची इच्छा नाही - भाजप नेते गिरीश महाजन - narayan rane claim

नारायण राणे यांनी मार्चमध्ये राज्यात भाजप सरकार स्थापन होईल असं वक्तव्य केलं. यावर भाजप नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली. सरकार यायचं तेव्हा येईल, आम्हाला सरकार पाडण्याची इच्छा नाही, आम्ही विरोधी पक्षात बसू, त्यांच्या पापाचा गडा भरणार आहे, त्यामुळे त्यांचं ते जातील, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं.

girish mahajan
भाजप नेते गिरीश महाजन

By

Published : Nov 27, 2021, 9:58 PM IST

Updated : Nov 27, 2021, 10:07 PM IST

औरंगाबाद -नारायण राणे (Narayan Rane) यांनी मार्चमध्ये राज्यात भाजप सरकार स्थापन होईल असं वक्तव्य केलं, मात्र यावर राज्यातील नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. सरकार यायचं तेव्हा येईल, आम्हाला सरकार पाडण्याची इच्छा नाही, आम्ही विरोधी पक्षात बसू, त्यांच्या पापाचा गडा भरणार आहे, त्यामुळे त्यांचं ते जातील, असं वक्तव्य भाजप नेतेगिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांनी केलं.

भाजप नेते गिरीश महाजन
  • राज्यातील सरकारला शून्य गुण -

राज्य सरकारला दोन वर्षे झाले. मात्र, यांना दहा पैकी शून्य गुण द्यायला पाहिजे, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. सरकारमध्ये असलेल्या अनेकांची चौकशी सुरू आहे, जितेंद्र आव्हाड असतील, अजित पवार यांची प्रकरणं असतील, मुख्यमंत्र्यांनी स्वतःची मालमत्ता लपवली, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे कोणीही गेले नाही, आमच्या सरकारच्या काळात अनेक आंदोलन केली आम्ही त्याला सामोरे गेलो, संवेदनशील सरकार नाही, काम करणारा कंत्राटदार त्रस्त आहे, सर्वसामान्यांकडे पाहण्यासाठी वेळ सरकारला नाही. मात्र, आर्यन खानबाबतीत बोलायला यांना वेळ भेटला, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

  • सरकार असंवेदनशील -

शेतकरी त्रस्त आहे, त्यांना दहा हजार कोटींचे पॅकेज दिलं. मात्र, ते पैसे अद्याप देण्यात आले नाही. आमच्या सरकारच्या काळात आम्ही तातडीची मदत केली, मुख्यमंत्री दोन वर्षात किती वेळ मंत्रालयात गेले? ते घरी बसून काम करतात, त्यांच्याकडे वेळ नाही. माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणतात, मात्र नुसत्या घोषणा करतात, जनतेने निवडूण दिलेलं सरकार नाही. अपघाती सरकार नाही, राजकारणात काही अशक्य नाही, सेना-काँग्रेस कधी सोबत येईल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला.

Last Updated : Nov 27, 2021, 10:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details