औरंगाबाद : रावसाहेब दानवे तडजोडीचे राजकारण करतात. स्वतःचा फायदा पाहतात असा आरोप, शिवसेना (Shiv Sena) नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. भाजप (BJP) सध्या शिवसेना फोडण्याचे पाप (BJP is committing the sin of breaking Shiv Sena) करत आहे. प्रत्येक नेत्याला ईडीचा धाक दाखवला जात आहे. आणि हे देशासाठी घातक आहे असे देखील खैरे (Chandrakant Khaire) यांनी म्हणटले आहे.
ई टिव्हीला प्रतिक्रीया देतांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरे मनातल बोलले :शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखतीत खरखर सांगितलं. लोकांच्या मनाला त्यांनी प्रभावित केले आहे. त्यांनी तळमळीने काम केलं. कोरोना काळा प्रमाणेच; राज्यातील उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात ठाकरे यांनी चांगले काम केले. लोकांची मान्यता त्यांना मिळाली. तरी भाजपचे लोक त्यांच्यावर टीका करत असतात आणि हे त्यांचे कामच आहे. विरोधक असावेत मात्र त्यांनी सरकारला मार्गदर्शन करावे, आणि काम करवून घ्यावे, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.
बंडखोर आमदारांचे मंत्रिपदासाठी शक्तिप्रदर्शन :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती नंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांना उत्तर दिले. मात्र संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलू नका, असे मत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले. संजय शिरसाट यांनी याआधीही पक्ष सोडला होता. त्यानंतर बाळासाहेबांवर त्यांनी टीका केली होती. मात्र नंतर त्यांनी माफी मागितली. बाळासाहेब उदार मनाचे होते, त्यांनी माफ केले. मात्र आज त्यांच्याच मुलावर आरोप करत आहेत. ते एकनाथ शिंदे यांची सभा घेणार आहेत, अस कळले. मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून हे आमदार आता शक्तिप्रदर्शन करत आहेत, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली. तर उध्दव आणि राज ठाकरे यांच्याबाबत आपण बोलणार नाही. ते दोघेही ठाकरे आहेत. त्यांनी एक व्हावं अस लोकांना वाटते. मात्र त्यावर बोलण्यास किंवा मध्यस्ती करण्यास आपण येवढे मोठे नाही, असे खैरे यांनी सांगितले.
हेही वाचा :Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, बाळासाहेब ठाकरे....