औरंगाबाद- मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray Public Meeting in Aurangabad ) यांची जाहीर सभा बुधवारी ( दि. 8 जून ) सायंकाळी संस्कृतिक क्रीडा मंडळ मैदानावर होणार आहे. मात्र, त्या आधीच भाजपने शहरात 'संभाजीनगर'बाबत जनता प्रश्न विचारात आहे, अशी बॅनरबाजी करत कुरघोडी केली आहे.
संभाजीनगरच्या घोषणेचा वर्धापन दिन? -उद्धव ठाकरे यांच्या सभा स्थळापासून अवघ्या काही अंतरावर भाजपने संभाजीनगर बाबत जनता प्रश्न विचारात आहे, असा बॅनर लावला आहे. बुधवारी (दि. 8 जून) औरंगाबाद शिवसेना वर्धापन दिन आहे. मात्र, हा वर्धापन दिन संभाजीनगर नावाच्या घोषणेचा वर्धापन दिन.? जनता वाट पाहत आहे, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.