महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

...म्हणून औरंगाबाद महापालिकेतील भाजपच्या उपमहापौराचा राजीनामा - औरंगाबादेत भाजप उपमहापौराचा राजीनामा

औरंगाबाद महानगरपालिकेतील भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला आहे. पाण्याच्या मुद्यावरून आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

BJP's Deputy Mayor resigns in Aurangabad Municipal Corporation
औरंगाबाद महानगरपालिकेतील भाजपच्या उपमहापौराचा राजीनामा

By

Published : Dec 13, 2019, 4:15 PM IST

औरंगाबाद -पाणी पुरवठा योजना रद्द केल्याच्या रागातून भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी महानगपरालिकेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शहराच्या पाणी प्रश्नावर हा राजीनामा दिला असून याचा राज्याच्या राजकारणाशी संबंध नसल्याचे विजय औताडे यांनी सांगितले.

शहरातील पाण्याच्या प्रश्नावरून औरंगाबाद महानगरपालिकेतील भाजपच्या उपमहापौराचा राजीनामा

हेही वाचा... भोपाळ : सुधारगृहातून तब्बल ८ बालगुन्हेगार फरार, प्रशासनाची बेपर्वाई चव्हाट्यावर

औरंगाबाद महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू होताच औरंगाबाद शहराला मंजूर झालेली योजना राज्य सरकारनेस्थगित का केली, यावरून शिवसेना भाजप आमने सामने आले. राज्यात शिवसेनेने युती तोडून सत्ता स्थापन केली. युती सरकारने सुरू केलेल्या कामांना महाविकास आघाडीनेस्थगिती दिली. स्थगिती दिलेल्या प्रकल्पात औरंगाबादसाठी मंजूर केलेल्या 1 हजार 680 कोटी रुपयांचा समावेश असल्याचा आरोप भाजपकडून केला गेला. त्याच मुद्द्यावरून औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपमहापौर विजय औताडे यांनी मंचावर बसणे टाळले.

हेही वाचा... राहुल गांधींच्या "त्या" वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

महापौर नंदकुमार घोडेले आणि विजय औताडे यांच्यात यानंतर शाब्दिक कलगीतुरा रंगला. त्यातूनच भाजप नगरसेवक विजय औताडे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला. दिलेल्या राजीनाम्याचा राज्यात असलेल्या घडामोडींशी संबंध नाही. शहरात असलेल्या पाण्याच्यासमस्येमुळेच राजीनामा दिला असल्याचे विजय औताडे यांनी सांगितले. राज्यात शिवसेना सत्तेत आल्यापासून भाजप नगरसेवकांचे वागणे बदलले असल्याचा आरोप महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला. आम्ही त्यांना राजीनामा द्या, असे म्हटले नव्हते. औरंगाबाद शहराला मंजूर झालेली योजना रद्द होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटून विनंती केली आहे. शहरासाठीची योजना रद्द होणार नाही. मात्र, भाजप सर्व ठरवून करत असल्याचा आरोप महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details