महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबादमध्ये ऑलिम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन - सायकल रॅलीचे आयोजन

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद व सायकलिस्ट असोसिएशन औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद शहरात I#Cheer4India Tokyo 2020 अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

सायकल रॅली
सायकल रॅली

By

Published : Jul 23, 2021, 10:10 PM IST

Updated : Jul 23, 2021, 10:22 PM IST

औरंगाबाद -जपानमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये देशाचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे. त्यांच्यामधील उत्साह वाढविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी खेळाडूंना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद व सायकलिस्ट असोसिएशन औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद शहरात I#Cheer4India Tokyo 2020 अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

ऑलिम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन

मोंढा नाका ब्रिजपासून या रॅलीस सुरुवात झाली. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रॅलीचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थित स्पोर्ट्स ऑथॉरीटी ऑफ इंडियाचे संचालक वीरेंद्र भांडारकर, सायकलिस्ट फाऊडेशन, औरंगाबादचे अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर, गोकुळ तांदळे आणि क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबादचे प्रबंधक संतोष देशमुख यांनीही सायकल रॅलीला झेंडा दाखवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोचे प्रबंधक संतोष देशमुख यांनी केले. या सायकल रॅलीतील सहभागींना क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो तर्फे I#Cheer4India Tokyo 2020 छापलेल्या टिशर्टचे वितरणही करण्यात आले. यावेळी खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी जयघोष करण्यात आला. भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी, अशी मनोकामना यावेळी उपस्थित सायकलपटूंनी केली.

Last Updated : Jul 23, 2021, 10:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details