औरंगाबाद - देश स्वतंत्र होण्यासाठी शेकडो वर्षे देशवासियांना संघर्ष केला. अनेकांनी आपले बलिदान दिले. याच लढ्याची साक्ष देत आहे टिळक नगर येथील भारत माता मंदिर ( Bharat Mata Temple Aurangabad ). हातात तिरंगा ध्वज घेतलेली आठ फुटी भारत मातेची मूर्ती आणि आसपास शंभर हुतात्मा क्रांतिकारकांचे फोटो आणि माहिती पूर्ण लढा दर्शवतात. अशी माहिती देणार देशातील असे एकमेव मंदिर असल्याच बोलले जात आहे.
बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची मिळते माहिती : भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झाली. देशाला जग भारत वेगळी ओळख मिळाली आहे. मात्र स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य देशवासियांना आपले प्राण पणाला लावले. इंग्रज राजवटीला उलथून लावण्यासाठी हुतात्म्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवले. त्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले. अशाच शंभर स्वातंत्र्य सैनिकांची माहिती या मंदिरात मिळते. मध्यभागी भारत मातेची मूर्ती आणि आजूबाजूला हुतात्म्यांचे फोटो आणि त्याखाली त्यांच्या बाबत आणि त्यांनी केलेल्या लढ्यातील योगदान बाबत माहिती आकर्षक स्वरूपात मांडण्यात आली आहे. जेणेकरून मिळालेले स्वातंत्र्य इतके सोपे नव्हते, हे नव्या पिढीला कळते, अशी माहिती माजी उपमहापौर संजय जोशी यांनी दिली.
इंग्रजांनी शिक्षा केलेल्या क्रांतिकारकांची माहिती :देशावर आपली मालकी सांगणाऱ्या इंग्रजांसोबत लढणं सोपे नव्हते. त्यावेळची अत्याधुनिक शस्त्र त्यांच्याकडे होती तर त्यांच्या विरोधात लढा उभारणाऱ्या क्रांतिकरकांकडे देशभक्ती शिवाय शस्त्र नव्हते. तरी देखील शेकडो वर्षे लढा लढण्यात आला. क्रांती घडवताना अनेक क्रांतिकारी इंग्रजांच्या हाती लागत होते. त्यावेळी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा दिल्या जात होत्या. सर्वात मोठी शिक्षा म्हणजे फाशी किंवा तोफेच्या तोंडी देणे होते. टिळक नगर येथील भारत माता मंदिरात अशाच क्रांतिकारकांची माहिती आहे. ज्यांना इंग्रजांनी शिक्षा करून मारले होते. त्यात महिला आणि युवतींचा देखील सहभाग होता. त्याबाबत सर्वांना माहिती व्हावी याकरिता मंदिरात तशी माहिती संकलित करून मांडल्याची, माहिती संजय जोशी आणि माजी नगरसेविका साधना सुरडकर यांनी दिली.