औरंगाबाद - शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या मृत्यूमुळे मोठी पोकळी निर्माण झाली असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि तपास यंत्रणा याची निश्चितच चौकशी करतील सत्य बाहेर येईलच महाराष्ट्र सरकार मेटे यांच्या कुटुंबीयांनाची असणारी मागणी निश्चित पूर्ण करतील असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बीडला रवानाशिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले होते त्यावेळी ते बोलत होते तिथून ते कारने बीडकडे रवाना झाले यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दरेकर संदिपान भुमरे अब्दुल सत्तार यांच्यासह समर्थक आमदार सोबत होते