औरंगाबाद -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डी.लिट ही पदवी देण्यात येण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. लवकरच अधिसभेच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली आहे.
BAMU D. Litt Degree : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शरद पवार, नितीन गडकरी यांना देणार डी. लिट पदवी - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पदवीदान सोहळा
राजकीय, सामाजिक, साहित्यिक, विज्ञान, कृषी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तीला मानद डॉक्टरेट पदवी देऊन विद्यापीठाकडून सन्मानित करण्यात येते. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी डिसेंबर 2020 मध्ये राजभवनाला पत्र लिहून शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी. लिट पदवी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता.
उल्लेखनीय कार्याबद्दल देणार पदवी - राजकीय, सामाजिक, साहित्यिक, विज्ञान, कृषी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तीला मानद डॉक्टरेट पदवी देऊन विद्यापीठाकडून सन्मानित करण्यात येते. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी डिसेंबर 2020 मध्ये राजभवनाला पत्र लिहून शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी. लिट पदवी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. अधिसभेच्या निर्णयानंतर विशेष सोहळा ठेऊन पदवी प्रदान करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.