औरंगाबाद - धर्मनिरपेक्ष घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे वंचित आघाडीसोबत बोलणी सुरू आहे. मात्र ते बोलताना एक बोलत असून करताना मात्र दुसरंच करत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. ते काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी औरंगाबादेत आले होते. यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली.
वंचितसोबत बोलणी सुरू; पण ते बोलतात एक अन् करतात दुसरंच, थोरातांचा आरोप - vanchit aghadi
वंचित आघाडीने आमच्या सोबत यावे, असे आपले मत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली.
वंचित आघाडीने आमच्या सोबत यावे, असे आपले मत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. तसेच विरोधक एईव्हीएमच्या विरोधात आहेत. भाजप-सेनेनेदेखील ईव्हीएम विरोधात भूमिका घेतली पाहिजे. जर त्यांना विश्वास आहे, तर त्यांनी भूमिका घ्यावी. ईव्हीएममध्ये पडलेले मतदान आणि व्हीव्हीपॅटमध्ये निघालेले मतदान यात तफावत असल्याने आपण ईव्हीएमला विरोध असल्याचेदेखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
ईव्हीएमच्या बाबतीत सर्व विरोधक एकत्र येत आहेत. राज ठाकरे यांची भेटी झाली असली तरी त्यांच्यासोबत निवडणुकीत हातमिवण्याबाबत अद्याप कुठलीही चर्चा नसल्याचं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक जण भाजपमध्ये जाणार असल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत. मात्र तसे काहीही नाही. वातावरण निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. असा आरोपही थोरात यांनी केला. सरकार आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण करत आहे. आरक्षणाबाबत प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे, असे मतही कंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केले.