महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Babasaheb Ambedkar Jayanti 2022 : औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातील बाबासाहेबांच्या वस्तू ठरतात 'प्रेरणादायी' - बाबासाहेबांच्या वस्तू ठरतात प्रेरणादायी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar Jayant 2022 ) यांच्यामुळेच आज वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची दार खुली झाली आहेत. त्याच्या पाऊलखुणा आजही अनुभवण्यास मिळतात, त्या मिलिंद ( Milind College Aurangabad ) महाविद्यालयात. त्यांनी वापरलेल्या वस्तूंचे जतन ( Items used by Babasaheb ) करण्यात आले असून आजही त्या नव्या पिढीला प्रेरणा देत आहेत.

मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद
मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद

By

Published : Apr 14, 2022, 7:06 AM IST

Updated : Apr 14, 2022, 7:12 AM IST

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. मराठवाड्यात एक सण म्हणून हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. त्याचे कारण देखील विशेष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar Jayant 2022 ) यांच्यामुळेच आज वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची दार खुली झाली आहेत. त्याच्या पाऊलखुणा आजही अनुभवण्यास मिळतात, त्या मिलिंद ( Milind College Aurangabad ) महाविद्यालयात. त्यांनी वापरलेल्या वस्तूंचे जतन ( Items used by Babasaheb ) करण्यात आले असून आजही त्या नव्या पिढीला प्रेरणा देत आहेत.

आढावा घेताना प्रतिनिधी




बाबासाहेबांनी स्थापन केलेले महाविद्यालय :मराठवाडा हा मागास भाग म्हणून परिचित होता. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालय नव्हते. उच्च शिक्षण घ्यायचे म्हणजे हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात जावे लागत होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची 1950 च्या दशकात स्थापना केली. हैदराबादच्या निजमानकडून जमीन विकत घेत गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली. आज हे महाविद्यालय वटवृक्षाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षणाची सावली देत आहे. सर्व प्रकारचे उच्च शिक्षण, संशोधन उपलब्ध असून लवकरच मेडिकल कॉलेज मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती प्राचार्या वैशाली प्रधान यांनी दिली आहे.



बाबासाहेबांच्या वस्तू ठरतात प्रेरणदायी :मिलिंद महाविद्यालयात एका डोममध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याकाळी वापरलेल्या वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी वापरलेले टॉवेल, नॅपकिन, खुर्ची, पलंग, गादी, कुशन असलेली आराम खुर्ची, मिलिंद महाविद्यालय स्थापन होताना देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सोबतचा दुर्मिळ फोटो, त्याकाळी ते वापरत असलेला डायनिंग टेबल, जर्मनची भांडी, वॉश बेसिन, काठी, त्यावेळी नकाशामध्ये दाखवण्यासाठी वापरलेली काडी, भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती असा संग्रह जतन करण्यात आला आहे. हा अनमोल ठेवा असून तो आम्ही जतन करून ठेवणार आहोत. नव्या पिढीला त्यामुळे नक्की प्रेरणा मिळेल, अशी माहिती मिलिंद महाविद्यायच्या प्राचार्या वैशाली प्रधान यांनी दिली आहे.

हेही वाचा -Dr Babasaheb Ambedkar Memorial : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे काम धीम्या गतीने

Last Updated : Apr 14, 2022, 7:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details