औरंगाबाद - एमआयएम चे नेते अकबरुद्दीन ओवैसी ( Aurangzeb tomb Aurangabad news ) यांच्या भेटीनंतर औरंगजेबच्या काबरीचा मुद्दा चर्चेचा विषय झाला आहे. कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पुढील पाच दिवस कबर परिसर ( Aurangzeb tomb area in Aurangabad closed ) पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय भारतीय पुरातत्व विभागाने घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या माहितीला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा -Aurangabad Bibi Ka Maqbara : 'बीबी'का मकबरा आहे मोगल शैलीचे उत्तम उदाहरण
मनसेच्या विरोधानंतर वातावरण तापले -अकबरुद्दीन ओवैसी यांनी खुलताबाद दौऱ्यावर असताना औरंगजेबच्या कबरीला भेटी दिली. त्यानंतर राजकीय पक्षांच्या भूमिकांमुळे राज्यातील वातावरण गरम झाले. महाराष्ट्रात औरंगजेबची कबर का? असा प्रश्न मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी केला. समाज माध्यमांवर काही अफवा पसरल्या असल्याने खुलताबाद येथील समाजिक वातावरण अस्थिर होत असल्याने औरंगजेबच्या कबरीजवळ मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. काही बंदूकधारी पोलिसांचा बंदोबस्त असून विशेष गस्त लावण्यात आली आहे.
कबर कमेटीने केली मागणी -गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून विविध पक्षांनी भूमिका मांडल्या आहे. त्यामुळे, समाजिक वातावरण खराब झाले आहे. त्यात आता औरंगजेब कबर कमेटीतर्फे परिसर पर्यटकांसाठी बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. कमेटीने केलेल्या मागणीनुसार कबर परिसर पर्यटकांसाठी पाच दिवस बंद ठेवण्यात येत असल्याचे, भारतीय पुरातत्व विभागाने सांगितले.
हेही वाचा -Aurangzeb Grave Controversy : अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेब कबर भेट; वाचा संजय राऊतांसह कोण काय म्हणाले...
वादाला कारणीभूत ठरली ही घटना -हैद्राबादच्या धरतीवर गरीब मुलांना शिक्षण मिळावे याकारिता हिमयात बाग परिसरात शाळा सुरू करण्यात येणार आहे. शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अकबरुद्दीन ओवैसी शहरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी खुलताबाद येथील दर्गाला भेट दिली. येथील मस्जिदीत नमाज देखील अदा केली. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ) एमआयएम नेते वारीस पठाण आणि स्थानिक नेत्यांसह अकबरुद्दीन ओवैसी औरंगजेबच्या कबरीवर गेले. येथे कबरीवर फुले वाहून ते पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्थ झाले.
या आधी निर्माण झाला होता वाद -औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून त्यांची हत्या केली होती. त्यामुळे, औरंगजेबबद्दल राजकीय पक्षांनी आपला द्वेष बोलून दाखवला होता. या आधी देखील अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबच्या कबरीला फुलं वाहिली होती. त्यावेळी शिवसेना आणि भाजपने टीका केली होती. इतकेच नाही तर एमआयएमला औरंगजेबची औलाद संबोधण्यात आले होते. तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Shiv Sena leader Chandrakant Khaire ) यांनी रझाकाराची औलाद म्हणून हिनवले होते. आता अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिल्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला.
या घटनेनंतर संजय राऊतांची अकबरुद्दीन ओवैसींवर आगपाखड -संजय राऊत यांनी अकबरुद्दीन ओवैसींवर आगापाखड केली. वारंवार औरंगाबादला यायचे, औरंगजेबच्या कबरीपुढे आम्हाला डीवचण्यासाठी गुडघे टेकायचे. यावरून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची, असे ओवैसी बंधूंचे राजकारण दिसत आहे. ज्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली आहे, तुम्ही त्या कबरीवर येऊन नमस्कार करता. तुम्हाला एक दिवस त्याच कबरीमध्ये जावे लागेल, असा इशाराही संजय राऊत यांनी अकबरुद्दीन ओवैसी यांना दिला होता.
'कबरीवर जाण्यावरून वाद कशाला' -खुलताबाद येथे ऐतिहासिक वारसा असलेल्या दर्गा आहेत. तिथे आम्ही गेलो होतो. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या औरंगजेबच्या कबरीवर गेलो. आमच्यात कोणाची कबर दिसली की प्रार्थना करण्याची परंपरा आहे. त्याला आम्ही डावलू शकत नाही. त्यावर राजकारण कशासाठी? असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला होता.
हेही वाचा -Aurangzeb : दिल्लीचा शहेनशहा औरंगजेबाची का आहे खुलताबादेत कबर, जाणून घ्या सविस्तर माहिती