औरंगाबाद - हैदराबादमधील आमदार आणि एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी ( MIM leader Akbaruddin Owaisi ) हे औरंगाबादेत शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अकबरुद्दीन ओवेसी गुरुवारी आले होते. यावेळी त्यांनी खुलताबाद येथील दर्गां आणि औरंगजेब यांच्या कबरीला भेट ( Akbaruddin Owaisi Visit Dargahs Khultabad ) दिली. मस्जिदीत नमाज देखील अदा केली. तसेच शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्यांची जीभ घसरली होती. त्यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावरुन भाजप आणि शिवसेना यांनी त्यांच्यावर टीका केली होती. तर संजय राऊत हे म्हणाले की, तुम्हालाही एक दिवस त्याच कबरीमध्ये जावे लागेल.
अकबरुद्दीन ओवेसींनी माफी मागावी -एएमआयएम ( AIMIM ) सामाजिक स्वास्थ खराब करत असल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Shiv Sena leader Chandrakant Khaire ) यांनी केला. मुस्लिम लोक देखील औरंगजेबाला ( Aurangzeb Grave Controversy ) मानत नाही. कोणी त्यांच्या कबरीवर जात नाही, आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम कुटुंबाने आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवले का? नाही ना, मग एमआयएमच्या नेत्यांना का जायची गरज पडते.आता अकबरुद्दीन ओवेसींनी ( MLA Akbaruddin Owaisi ) माफी मागावी अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली.
'कबरीवर जाण्यावरून वाद कशाला' :खुलताबाद येथे ऐतिहासिक वारसा असलेल्या दर्गा आहेत. तिथे आम्ही गेलो होतो. त्यावेळी त्यां ठिकाणी असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवर गेलो. आमच्यात कोणाची कबर दिसली की प्रार्थना करण्याची परंपरा आहे. त्याला आम्ही डावलू शकत नाही, त्यावर राजकारण कशासाठी, असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jaleel on Chandrakant Khaire ) यांनी उपस्थित केला होता.
या आधी निर्माण झाला होता वाद -औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून त्यांची हत्या केली होती. त्यामुळे औरंगजेबाबद्दल राजकीय पक्षांनी आपला द्वेष बोलून दाखवला होता. या आधी देखील अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला फुल वाहिली होती. त्यावेळी शिवसेना आणि भाजपने टिका केली होती. इतकंच नाही तर एमआयएमला औरंगजेबाची औलाद संभोधण्यात आल होते, तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Shiv Sena leader Chandrakant Khaire ) यांनी रझा काराची औलाद म्हणून हिनवलं होत. आता अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेब कबरीला भेट दिल्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होईल अशी शक्यता नाकारता येत नाही.
अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले - मी इथे शाळा उघडायला आलोय, जे माझ्या सोबत आहेत, त्या सगळ्यांचे खूप खूप आभार, जी लोक कोविड काळात बेड मिळले नाही म्हणून ऑक्सिजन मिळाले नाही, मृत्यू झाला त्या सगळ्यांबाबत मी दुवा करतो. या देशात सगळ्यात मागासलेले कुणी असेल तर ते मुसलमान आहे. मी आभार मानतो ज्यांनी इम्तियाज जलील याना संसदेत पाठवले. तर दरम्यान, 'श्वान भुकतोय भुंकू द्या, त्यांच्या जाळ्यात अडकू नाका, शांत राहा, जो बोलतोय त्याला बोलू द्या, आपण हसत पुढे जायचे, श्वांनाचे काम भुंकने आहे, वाघाचे काम शांतीत जाणे आहे.' अशी टीका एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवेसी ( Akbaruddin Owaisi ) यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे.
मी समाजासाठी काम केले - आमच्या मनात सगळ्यासाठी जागा आहे. 2020 च्या सर्वे नुसार 5.5 टक्के मुस्लिम उच्च शिक्षण घेतात. देशात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त उर्दू शाळा महाराष्ट्रात आहेत मात्र त्यांची परिस्थिती फारच खराब आहे. मुस्लिम शिक्षणात मागे आहे. त्याची आकडेवारी देताय. औरंगाबादेत 2021-22 मध्ये 10 वीच्या 8 हजार मुस्लिम मुलांनी शाळा सोडली, परीक्षा नाही दिली, मला कधीच राजकारण करायचे नाही करत नाही. मी ही शाळा उघडली. मला कधी आमदार खासदार व्हायचे नव्हते. मी मेल्यावर अल्लाह विचारेल तुला इतके सगळे दिल तर तू समाजासाठी काय केले तर मी सांगेल होय मी समाजासाठी काम केले.