औरंगाबाद -राज्यभर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेत असताना, काही भागांमध्ये शालेय विद्यार्थी मदरशामध्ये School students are going to Madrasa जात असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या निदर्शनास आली आहे. त्यावर आता औरंगाबाद प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सर्व तालुक्याच्या पंचायत समिती आणि गटशिक्षणाधिकारी यांना याबाबत माहिती सादर करण्याच्या आदेश दिले आहेत.jilha parishad school
कादराबाद येथील सर्वेक्षणात प्रकार समोर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. कादराबाद या गावातील जिल्हा परिषद शाळेची तपासणी करताना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना धक्कादायक बाब समोर आली. त्यामध्ये गैरहजर असलेले विद्यार्थी त्यावेळेस मदरशात जाऊन शिक्षण घेतात, ही बाब समोर आली. त्याचबरोबर इतर काही गावातही असे प्रकार होत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशा मुलांची संख्या किती आहे, याबाबत जिल्हा परिषद तर्फे Aurangabad Zilla Parishad आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. Aurangabad news