औरंगाबाद : औरंगाबाद येथील पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाठयांना त्यांच्या मतदारसंघातील मतदाराने पत्र लिहून समाचार घेतला. संजय शिरसाठ दगड असून, त्यांनी त्यांचा मुलगादेखील आमच्यावर लादला असल्याची टिका केली आहे. तर युवा सेनेचे किरण लखनानी ( Kiran Lakhnani of Yuva Sena ) यांनी पत्र लिहित ज्या भाजपने तुमचा पराभव करण्यासाठी त्यांचा उमेदवार उभा केला. त्याला मदत केली. त्यावेळी याच शिवसैनिकांनी जीवाचे रान केले होते. अशा भाजपसोबत जाण्यासाठी तुम्ही गद्दारी केली, असा जाब विचारला आहे.
संजय शिरसाठ यांनी लिहले होते मुख्यमंत्र्यांना पत्र :शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत सेनेचे अनेक आमदार गेले. त्यातील औरंगाबादमधील पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाठ हेदेखील तेथील आमदार त्यात आहेत. त्यांनीही बंड पुकारल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून त्यांच्या कारभाराबाबत टीका केली आहे. त्यांनी पत्रात असे म्हटले की, उद्धव साहेब आता खरे शिवसैनिकांना मातोश्रीचे दरवाजे उघडे झाले आहेत. त्यामुळे अडीच वर्षे बंद असलेले दरवाजे आज उघडले. त्यामुळे आम्ही आनंदात आहोत. हाच धागा पकडून त्यांच्याच मतदारसंघातील मतदाराने त्यांना एक खरमरीत पत्र लिहून जाब विचारला आहे.
संजय शिरसाठ यांच्या मतदारसंघातील मतदार नाराज :जाब संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून जाब विचारला. परंतु, त्यांच्या मतदारसंघातील मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांना उमेदवार म्हणून स्वीकारण्यास मतदार तयार नव्हते असे असताना केवळ शिवसेनेवरील प्रेमापोटी मतदारांनी त्यांना निवडून आणले. तसेच, भाजपने त्यांच्याविरोधात 2019 साली उमेदवार उभा करून त्याला रसद पुरवली. आता ते त्यांच्या सोबत जात आहेत. या सगळ्याचा जाब विचारायला त्यांना खालील खरमरीत पत्र लिहले आहे. पाहूया काय आहे पत्रात........
असे आहे मतदाराचे पत्र.......
प्रिय,
संजय शिरसाटजी...
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपण लिहिलेल्या पत्राबाबत आपल्याच मतदारसंघातील एका शिवसैनिकाच्या भावना..
आमचे वडील सांगतात आपण सक्रिय राजकारणात येण्या आधी रिक्षाचालक होता आणि आपणही हे अनेक वेळा जाहीररित्या बोलून दाखवले आहे. संभाजीनगर स्थानिक शिवसेना नेत्यांवर विश्वास ठेवून आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला पक्षाच्या, लोकप्रतिनिधी पदाच्या अनेक जबाबदाऱ्या दिल्या आणि आपण सर्वसाधारण रिक्षावालापासून ३ वेळेस आमदार झालात.