महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aurangabad Truck Bike Accident : पंढरपूर येथे दुचाकी-ट्रकचा भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू - दुचाकी-ट्रक भीषण अपघातात महिलेचा मृत्यू

औरंगाबादेत रिक्षाने दुचाकीला हुलकावणी दिल्याने पाठीमागून येणाऱ्या भरधाव गॅस ट्रकने दुचाकीला मागून धडक ( Aurangabad Truck Bike Accident ) दिली. यात बाबू हे दूर फेकले गेले तर पत्नी ट्रकच्या समोरील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान ट्रॅक चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

Aurangabad Truck Bike Accident
औरंगाबादेत दुचाकी-ट्रकचा भीषण अपघात

By

Published : Dec 2, 2021, 7:39 PM IST

Updated : Dec 2, 2021, 9:59 PM IST

औरंगाबाद - बँकेत कामानिमित्त जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला रिक्षाचालकाने हुलकावणी दिल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक ( Aurangabad Truck Bike Accident ) दिली. या धडकेत ३४ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू तर पती जखमी झाला आहे. ही घटना आज (गुरुवार) दुपारी दोन वाजता पंढरपूर येथील ओयासिसी चौकात घडली.

भरधाव गॅस ट्रकने दुचाकीला मागून दिली धडक -

राधा बाबू भालेराव वय ३४ गट न.१२ वडगाव कोल्हाटी असे मयत महिलेचे नाव आहे. बाबू किशन भालेराव वय ३८ रा. गट न.१२ वडगाव कोल्हाटी असे जखमी पतीचे नाव आहे. बाबू हे एका खाजगी कंपनीत नोकरीला असून पत्नी राधा या घरकाम करत होत्या. दरम्यान गुरुवारी दुपारी बाबू हे पत्नी राधा यांना घेऊन कामानिमित्त बँकेत जात होते. यावेळी समोर असलेल्या रिक्षाने दुचाकीला हुलकावणी दिल्याने पाठीमागून येणाऱ्या भरधाव गॅस ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. यात बाबू हे दूर फेकले गेले तर पत्नी ट्रकच्या समोरील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान ट्रॅक चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणाचा अद्याप गुन्हा दाखल झाला नाही आहे. राधा यांच्या पश्चात दोन लहान मुले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

हेही वाचा -Mother Kills baby in Mumbai : बाळ पळवून नेल्याचा बनाव करत आईनेच केली मुलीची हत्या, 'हे' होते कारण

Last Updated : Dec 2, 2021, 9:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details