औरंगाबाद - शहरातील नवमतदारांच्या सरकारकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, तसेच राज्याच्या राजकारणाबाबत त्यांना काय वाटंत. हे जाणून घेण्याचा ईटीव्ही भारतने प्रयत्न केला आहे.
'निवडणूक ही मूलभूत प्रश्नांवर व्हावी'
विधानसभा असो की, कोणतीही निवडणूक ही मूलभूत गरजा आणि निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर आधारित असावी, अशी इच्छा औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
औरंगाबादचे नवमतदार म्हणतायत, 'निवडणूक ही मूलभूत प्रश्नांवर व्हावी' हेही वाचा... महाराष्ट्र बोलतोय : राज्यातील व्यापाऱ्यांच्या नजरेतून सरकारची कामगिरी
देशात, राज्यात होत असलेले जातीय राजकारण नाहीसे व्हावे
प्रत्येक निवडणुकीत आजच्या गरजा काय आहेत, तरुणांना असणाऱ्या समस्या याकडे कोणी लक्ष न देता भावनिक आणि धार्मिक मुद्द्यांवर लढवली जाते. त्यामुळे नेत्यांनी आता विकासावर बोलावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
बेराजगारी कमी व्हावी, युवा वर्गाला नोकरी मिळावी
आज युवकांना चांगले शिक्षण आणि चांगली नोकरी याची गरज आहे. लहान शहरात रोजगार नसल्याने युवकांना मोठ्या शहरात जावे लागत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी प्रचारात या मुद्द्यांवर बोलावे, अशी भावना युवकांनी व्यत्त केली आहे.
हेही वाचा... चिखली विधानसभा : काँग्रेस आमदार बोन्द्रेंची हॅट्रीक भाजप रोखणार का?
युवकांसाठी काय करणार हे सरकारने, प्रत्येक पक्षाने अश्वाशीत करायला हवे, अशी इच्छा औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तसेच उमेदवारांनी वेळोवेळी दिलेली आश्वासने पुर्ण करावीत. गेली अनेक वर्षे त्याच त्याच मुद्द्यांवर निवडणूक लढवली जात आहे, ही जनतेची फसवणूक आहे.