महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबादेत शिवसेनेची पूरग्रस्तांसाठी मदत फेरी - मदत फेरी

सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी औरंगाबादेत शिवसेनेच्या वतीने मदत फेरी काढण्यात आली. या वेळी नगद पैसे, कपडे, खाद्यपदार्थ यांसह मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा गोळा झाला, लवकरच हे साहित्य पूरग्रस्तांना पाठविले जाणार आहे.

औरंगाबादेत शिवसेनेची पुरग्रस्तांसाठी मदत फेरी

By

Published : Aug 11, 2019, 9:00 AM IST

औरंगाबाद -सांगली व कोल्हापूरमध्ये आलेल्या भीषण पूरामुळे हजारो नागरिक प्रभावित झाले आहेत. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरात शिवसेनेच्या वतीने मदत फेरी काढण्यात आली होती. या वेळी नगद पैसे, कपडे, खाद्यपदार्थ यांसह मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा गोळा केला, लवकरच हे साहित्य पूरग्रस्तांना पाठविले जाणार आहे.

औरंगाबादेत शिवसेनेची पुरग्रस्तांसाठी मदत फेरी

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शिवसेनेची मदत फेरी

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाल्याने अनेक कुटुंबाचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्याठिकाणी मदतीचा ओघ अनेक ठिकाणाहून सुरू झाला आहे. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी म्हणून औरंगाबादेत शिवसेनेच्या वतीने सिडको-हडको भागात मदत फेरी काढण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी मदतीची मागणी केली, त्याला परिसरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

दुकानदार, नागरिकांनी कपडे, खाद्यपदार्थ यांसह आर्थिक मदत केली. तरुणांच्या एका गटाने विविध औषधांचा मोठा साठा पूरग्रस्तांना मदत म्हणून शिवसेनेच्या पदाधिकार्यांकडे दिला आहे. ही मदत लवकरात लवकर पुरग्रस्तांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. येत्या काळातही औरंगाबाद शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचा कार्य सुरू राहणार असल्याचे, शिवसेनेचे शहर अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details