महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक, शहरात शक्तिप्रदर्शन - Aurangabad Politics

औरंगाबाद जिल्ह्यातील ( Aurangabad district ) बंडखोर सेना आमदारांच्या विरोधात शिवसैनिक (Shiv Sainik ) आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आहेत. क्रांतिचौक भागातून मध्य आणि पश्चिम मतदार संघातून गद्दार आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी करत सेनेने स्थानिक पातळीवर शक्तिप्रदर्शनास केले.

Aurangabad Political
Aurangabad Political

By

Published : Jun 29, 2022, 3:52 PM IST

औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यातील ( Aurangabad district ) बंडखोर सेना आमदारांच्या विरोधात शिवसैनिक (Shiv Sainik ) आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आहेत. क्रांतिचौक भागातून मध्य आणि पश्चिम मतदार संघातून गद्दार आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी करत सेनेने स्थानिक पातळीवर शक्तिप्रदर्शनास केले.

औरंगाबाद

शिवसेनेचे 5 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत -
औरंगाबाद जिल्ह्यातील 5 आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडखोरी करून गेले आहेत. त्यामध्ये औरंगाबाद पश्चिमचे संजय शिरसाठ, मध्यचे प्रदीप जैस्वाल, वैजापूरचे रमेश बोरणारे, सिल्लोडचे अब्दुल सत्तार आणि पैठण मतदार संघाचे संदीपान भुमरे यांचा समावेश आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून जिल्ह्यात या आमदारांविरोधात आंदोलन केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील दोन मतदार संघातून वाहन रॅली काढण्यात आली. हातात बंडखोर आमदारांच्या फोटोवर फुली मारून निषेध व्यक्त केला जात आहे. जवळपास 100 ते 150 गाड्यांवर शिवसैनिक हातात भगवा झेंडा घेऊन आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत.

जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक -

औरंगाबाद जिल्ह्यात सेनेच्या 5 बंडखोर आमदारांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले जात आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, अंबादास दानवे यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदार संघात विभागवार मेळावे घेत शिवसैनिकांना एकत्र लढण्याचे निर्देश दिले. आमदार गेले तरी शिवसेना बांधून ठेवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात येत आहे. याच शिवसैनिकांच्या विश्वासावर आणि मेहनतीवर निवडणून आले आणि आज त्यांनी पक्षाची आणि प्रमुखांशी नाते तोडले. त्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाही, असा इशारा अंबादास दानवे यांनी यावेळी दिला.

त्यामुळे 'संभाजीनगर'चा विषय घेतला -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादेत सभेसाठी आले असताना जिल्ह्याचा विकास करू आणि नंतरच जिल्ह्याला संभाजी महाराजांचे नाव देऊ असे सांगितले होते. मात्र, अचानक पुन्हा संभाजीनगर नामांतराचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडणार असल्याचं सेनेने जाहीर केलं होतं. याला सेनेच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. नामांतर सेनेचा अजेंडा आहे. उद्या सरकार बदललं तर प्रस्ताव दिला जाईल की नाही, याबाबत शंका असल्याने अचानक हा प्रस्ताव देण्यात येत असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -यशवंत सिन्हा यांना पूर्ण मतदान करणारे केरळ एकमेव राज्य

ABOUT THE AUTHOR

...view details