औरंगाबाद - घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. मध्यरात्री अज्ञात रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याने संप पुकारण्यात आला असून तीनशेहून अधिक निवासी डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.
अपघातग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांनी केली मारहाण - घाटी रुग्णालयात मध्यरात्री अडीच वाजता अपघातग्रस्त रुग्ण उपचारासाठी दाखल झाला. या रुग्णाचे सिटी स्कॅन केल्यावर रुग्णाला दाखल करून उपचार सुरू करण्यात आले होते. रुग्णाने उलटी केल्याने त्यांच्या अन्न नलिकेत डॉक्टरांनी उपचारासाठी नळी टाकली. त्याचवेळी घाटी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी उपचार योग्य नसल्याचा आरोप करत डॉक्टरांना मारहाण केली. आणि रुग्णाला घेऊन निघून गेले आहे.