औरंगाबाद -ठाकरे सरकारने पाय उतार होत असताना औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पारीत ( Aurangabad Renamed Sambhaji nagar ) केला. यात आधीपासून नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिला. मात्र त्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसचे ( Aurangabad congress workers ) माजी पदाधिकारी आक्रमक झाले असून शहराच्या बदलाच्या मुद्द्यावर आंदोलन उभारण्याच्या तयारीत ( congress workers doing Rebellion ) आहेत.
हेही वाचा -Aurangabad Renamed Issue : संभाजीनगर मुद्द्यावर काँग्रेस माजी पदाधिकाऱ्यांची राजीनाम्याची स्टंटबाजी
माजी शहारध्यक्ष सुरु करणार आंदोलन - शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव पारीत होताच काँग्रेस शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांच्यासह जिल्ह्यातील तीनशे पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्ष पदाचे राजीनामे दिले. ज्या काँग्रेस पक्षाने धर्मनिरपेक्ष म्हणून आपली प्रतिमा तयार केली. त्याच पक्षातील मंत्र्यांनी मंत्रिमंडळात शहराचे नाव बदलणताच्या प्रस्तावाला मंजुरी कशी दिली, असा संतप्त प्रश्न शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी उपस्थित केला. यापुढे माझ्या शहराचे नाव बदलण्यास माझा विरोध राहील. आम्ही आमच्या विचारधारेला मानणाऱ्या मतदारांना काय सांगायचे. त्यामुळे मी जिल्ह्यातील समाजिक चळवळ चालवणाऱ्या नागरिकांना सोबत घेऊन नामांतर विरोधी चळवळ चालणार असून त्यात वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन, स्वाक्षरी मोहीम यांच्यासह रस्त्यावरील आंदोलनाचा समावेश उस्मानी हिशाम उस्मानी यांनी सांगितले.