औरंगाबाद - औरंगाबादशहराचे नाव संभाजीनगर करण्याच्या निर्णय ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत जाताजाता घेतला. मात्र, त्यानंतर काँग्रेसमध्ये शहरातील आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले. यामध्ये काही पदाधिकाऱ्यांनी स्टंटबाजी केल्याचे समोर आले आहे. काही माजी पदाधिकाऱ्यांनी तर सदस्य नसलेल्या काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर राजीनामा दिल्याचं सांगत वाह वाह मिळवण्याचा प्रयत्न केला असून या स्टँटबाजची दखल घेण्याची मागणी माजी शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी केली आहे.
अनेकांनी केली स्टँटबाजी -औरंगाबाद जिल्ह्याच्या नामकरणाचा मुद्दा 1988 पासून राजकारणाचा भाग राहिला आहे. शिवसेनेने पक्षाचं धोरण सांगून प्रत्येक निवडणुकीत नामंतरचे भांडवलं केले. त्याला भाजपने साथ दिली. मात्र आता राज्य सरकारने संभाजीनगर नावाचा प्रस्ताव मंजूर करताच अनेकांनी त्यावर राजकारण करायला सुरुवात केली. यात कोणी श्रेय घेतलं तर कोणी आपल्याला निर्णय मान्य नसल्याच सांगत पक्ष सोडत आहे. मात्र यात काही जणांनी स्टँटबाजी केल्याच समोर आले आहे. जिल्हा काँग्रेसमध्ये जवळपास तीनशे जणांनी पदाचे राजीनामे दिले. सोशल मीडियावर आपली पत्र त्यांनी टाकली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे अनेकांनी स्वागत केले. त्यांचं कौतुक केल त्यामुळे या परिस्थितीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत काँग्रेसच्या पदाचा आधीच राजीनामा देणाऱ्या, तर पक्ष सोडणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर संभाजीनगरच्या मुद्द्यावरून राजीनामा देत असल्याचे सांगत पोस्ट टाकल्याचे पाहायला मिळाले. यासाठी काही लोकांनी खोटे लेटर पॅड देखील तयार केले. त्यामुळे अशा लोकांची दखल पक्षाने घ्यावी अशी मागणी माजी शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी केली आहे.
राज्यात अनेकांचे राजीनामे -उद्धव ठाकरे सरकार पायउतार होत असताना गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचा नामांतराचा प्रस्ताव पारीत केला. विशेषतः हा प्रस्ताव पारित करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी याला साथ दिली. याचाच राग मनात धरत एका रात्रीतून जवळपास तीनशे पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा त्याग केल्याच समोर आल. मंत्रिमंडळाने घेतला निर्णय काँग्रेच्या मंत्र्यांनी जरी मान्य केला असला तरी स्थानिक पातळीवर हा निर्णय मान्य नसल्याच सांगत शहर जिल्हाध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी सर्वात आधी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकमागे एक राजीनामे आले. राज्यातून सातशे ते आठशे लोकांनी राजीनामा दिल्याची माहिती माजी शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी दिली. जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात भूकंप झाला असून आता आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस अडचणीत येईल अस बोललं जात आहे.