औरंगाबाद - सुवर्ण कारागिराचे अपहरण करणाऱ्या आरोपीस सिटीचौक पोलिसांनी बीडमधील माजलगाव तालुक्यातील कोठाळा येथून अटक केली. महेश राजीव टाक असे आरोपीचे नाव आहे.
एक लाखासाठी अपहरण; पोलिसांनी बीडमध्ये धाड टाकून सुवर्ण कारागिराची केली सुटका - सिटीचौक पोलीस ठाणे
महेश टाक या आरोपीने १ लाख रुपयांसाठी सुवर्ण कारागीर संतोष गोफने यांचे अपहरण करुन त्यांना माजलगाव येथे डांबून ठेवले होते.
आरोपी
आरोपी महेशने १ लाख रुपयांसाठी सुवर्ण कारागीर संतोष गोफने यांचे अपहरण करुन माजलगाव येथे डांबून ठेवले होते. या विषयी तक्रार प्राप्त होताच सिटीचौक पोलीस बीड जिल्ह्यात गेले. त्यानंतर त्यांनी कोठाळा येथील एका शेतातील खोलीत डांबून ठेवलेल्या कारागिराची मुक्तता केली. तसेच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : May 28, 2019, 3:19 PM IST