महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात मिळणार नाही पेट्रोल, नवीन नियमावली लागू - Aurangabad District Latest News

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रदूर्भाव लक्षात घेता पेट्रोल पंप चालक संघटनांनी नवीन नियमावली लागू केली आहे. त्यानुसार बंदच्या काळात सर्वसामान्यांना पेट्रोल मिळणार नाही. अत्यावश्यक सेवांना मात्र सत्यता पडताळणी केल्यावर पेट्रोल किंवा डिझेल मिळेल असा निर्णय असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे.

लॉकडाऊनदरम्यान पेट्रोल मिळणार नाही
लॉकडाऊनदरम्यान पेट्रोल मिळणार नाही

By

Published : Mar 26, 2021, 6:14 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रदूर्भाव लक्षात घेता पेट्रोल पंप चालक संघटनांनी नवीन नियमावली लागू केली आहे. त्यानुसार बंदच्या काळात सर्वसामान्यांना पेट्रोल मिळणार नाही. अत्यावश्यक सेवांना मात्र सत्यता पडताळणी केल्यावर पेट्रोल किंवा डिझेल मिळेल असा निर्णय असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे.

रात्री 8 नंतर मिळणार नाही पेट्रोल

11 मार्च ते 4 एप्रिल या काळात जिल्ह्यासाठी नवीन नियमावली लावण्यात आली आहे. त्यानुसार रात्री आठनंतर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. इतकंच नाही तर आठवड्याच्या शेवटचे दोन दिवस म्हणजे शनिवारी आणि रविवारी दोन दिवस पूर्ण लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे त्यानुसार अनावश्यक फिरणाऱ्या लोकांवर निर्बंध घालण्यासाठी पेट्रोल पंपवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत.

तीन पेट्रोल पंप करण्यात आले होते सील

रात्री आठ नंतर पेट्रोल दिल्यामुळे शहरातील तीन पेट्रोल पंप जिल्हा प्रशासनाने सील केले होते. बंदच्या काळात पेट्रोल पंपवर गर्दी झाल्याने ही कारवाई झाल्याचं सांगण्यात येत असलं, तरी ऑनलाईन फूड देणाऱ्या गाडी चालकाला पेट्रोल दिल्याने ही कारवाई करण्यात आली होती. मात्र अन्न पोहोचवणे अत्यावश्यक असल्याचा समज असल्याने पेट्रोल देण्यात आलं. मात्र यापुढे रात्री 8 ते सकाळी पाचपर्यंत कोणाली पेट्रोल देण्यात येणार नाही, तसेच शनिवार आणि रविवारी देखील पेट्रोल देण्यात येणार नाही. अत्यावश्यक सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना पेट्रोल पुरवठा सुरू राहिल, मात्र त्याची देखील खात्री करून पेट्रोल देण्यात येईल. अशी माहिती पेट्रोल पंप चालक संघटनेचे अखिल अब्बास यांनी दिली आहे.

नो मास्क, नो पेट्रोल

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता, नागरिकांनी स्वरक्षणासाठी मास्क वापरावा असे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांना शिस्त लावण्यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. त्यात रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्याप्रमाणे विनामास्क वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना पेट्रोल न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपांवर नो मास्क, नो पेट्रोल असे फलक लावण्यात आले आहेत. त्याच पालन करण्यात येत असल्याची माहिती पेट्रोल पंप चालक संघटनेचे अखिल अब्बास यांनी दिली आहे. औरंगाबाद मधील पेट्रोल पंपावरील परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.

लॉकडाऊनच्या काळात मिळणार नाही पेट्रोल

ABOUT THE AUTHOR

...view details