महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरण : दीड दिवसानंतरही युवतीचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार - औरंगाबाद

चेंबूर सामूहिक बलात्कार पीडितेचा मृत्यू होऊन सुमारे दीड दिवस उलटला आहे. मात्र जो पर्यंत नराधम आरोपी अटक होत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे.

युवतीचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार

By

Published : Aug 30, 2019, 3:11 PM IST

औरंगाबाद -मुंबईतील चेंबूर येथे बलात्कार झालेल्या जालन्यातील युवतीवर मागील दोन महिन्यापासून औरंगाबादच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू होते. या युवतीचा गुरूवारी मृत्यू झाला. मात्र दोन महीने उलटूनही आरोपी अटक न झाल्याने नातेवाईकांनी आता आरोपी अटक होत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

युवतीचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार

चेंबूर प्रकरणी गुन्हा दाखल होऊन सुमारे 35 दिवस उलटले आहे. मात्र अद्यापही चुनाभट्टी पोलिसांना या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही. बुधवारी रात्री या पीडितेचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. त्यामुले संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तेव्हापासून मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. शुक्रवारी या पीडित युवतीचा मृत्यू होऊन दीड दिवस झाले आहे. मात्र अजूनही मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आलेले नाही. शवविच्छेदन करण्यात पीडितेच्या वडिलांनी नकार दिला आहे. त्याच बरोबर जो पर्यंत बलात्कार करणारे आरोपी अटक होणार नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशा भूमिकेवर ते अडून असल्याने पोलिसांसमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा... चुनाभट्टी बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

हेही वाचा... चेंबूर येथे बलात्कार झालेल्या जालन्याच्या 'त्या' पीडितेचा मृत्यू

हेही वाचा... एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 'तिचा' मृत्यू; मात्र आरोपी अद्याप मोकाटच

सर्वपक्षीय आंबेडकरी संघटनेकडून निवेदन

मागील महिनाभरापासून मेडिसिन विभागात पीडित मुलीवर उपचार सुरू होते, मात्र उपचारात डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संबंधी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे वैधकीय अधिष्ठाता कानंनबाला येळीकर यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा...

मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली अन् चार नराधमांची शिकार झाली; जालन्याच्या तरुणीवर मुंबईत अत्याचार​​​​​​​

पीडित तरुणीला न्याय मिळाला नाही, तर मुंबईसह राज्यभर तीव्र आंदोलन करू - राष्ट्रवादी​​​​​​​

अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जळगावात 'जनआक्रोश'

ABOUT THE AUTHOR

...view details