महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबाद : 45 वर्षांहून अधिक असाल तर घ्या लस, अन्यथा भरावा लागणार 'इतका' दंड - औरंगाबाद जिल्हा बातमी

45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लस न घेता घराबाहेर पडल्यास पाचशे रुपयांचा दंड औरंगाबाद महापालिका करणार आहे, असा प्रस्ताव विचाराधिन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. लसीकरणाचा टक्का वाढावा यासाठी हे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jun 5, 2021, 8:14 PM IST

Updated : Jun 5, 2021, 9:06 PM IST

औरंगाबाद- तुमचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आता शहरात रस्त्यावर वावरताना आता लसीकरण झालेले असणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर लस न घेता तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला पाचशे रुपयांचा दंड भरावा लागणार आहे, असा प्रस्ताव विचाराधिन आहे. लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी महापालिका लवकरच याबाबत निर्णय घेईल, माहिती पालिका आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

बोलताना पालिका आरोग्य अधिकारी

लसीकरण वाढवण्यासाठी पालिकेचा प्रयत्न

औरंगाबाद शहराची लोकसंख्या 17 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यानुसार शहरात 20 टक्के इतके म्हणजेच 3 लाख 8 हजार इतक्या नागरिकांनी लसीकरण करून घेतले. यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांचा देखील समावेश आहे. लसीकरणाचा टक्का वाढला तर शहरातून कोरोनाला हद्दपार करणे शक्य होणार असल्याने 45 वर्षीय नागरिकांनी जास्तीतजास्त लसीकरण करून घ्यावे यासाठी लसीकरण मोहीम वेगाने व्हावी यासाठी 45 वर्षीय नागरिक लस न घेता बाहेर पडल्यास पालिका 500 रुपयांचा दंड आकारणार असल्याची माहिती डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

शहरात लस झाल्या उपलब्ध

दोन आठवड्यांपूर्वी लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहीम थांबवण्यात आली होती. इतकेच नाही तर वय वर्ष 18 ते 44 मधील नागरिकांचे लसीकरण थांबवण्यात आले आहे. त्यामुळे आता 45 वर्षांवरील नगरिकांचेच लसीकरण केले जात आहे. आता लसींचा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी पालिकेकडून दंड लावण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

हेही वाचा -ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक; औरंगाबादेत आंदोलन

Last Updated : Jun 5, 2021, 9:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details